जर तुम्ही WhatsApp वापरकर्ता असाल आणि तुमचे स्टेटस किंवा फोटो पोस्ट केल्यानंतर ते धूसर किंवा अस्पष्ट दिसत असतील, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. WhatsApp ने आपल्या सेटिंग्जमध्ये असा एक पर्याय उपलब्ध करून दिला आहे, ज्यामुळे तुम्ही तुमचे स्टेटस(status) आणि फोटो एचडी क्वॉलिटीमध्ये अपलोड करू शकता. आता फक्त काही सेटिंग्ज बदलल्याने तुमचे फोटो आणि व्हिडिओ अधिक स्पष्ट, आकर्षक आणि प्रोफेशनल दर्जाचे दिसतील.

अनेकदा WhatsApp आणि Instagram हे अॅप्स डीफॉल्टने कमी गुणवत्तेची सेटिंग ठेवतात, जेणेकरून अॅप्स जलद चालतील आणि डेटाचा वापर कमी होईल. परंतु याच कारणामुळे तुम्ही पोस्ट केलेले फोटो किंवा व्हिडिओ एचडी क्वॉलिटीत दिसत नाहीत. यासाठी खालील सेटिंग्ज बदलणे आवश्यक आहे.
WhatsApp मध्ये सेटिंग्ज कसे बदलाल:
WhatsApp उघडा आणि सेटिंग्ज मध्ये जा.
त्यानंतर स्टोरेज अँड डेटा या पर्यायावर टॅप करा.
पुढे मीडिया अपलोड क्वॉलिटी निवडा.
येथे ‘एचडी क्वॉलिटी ’ पर्याय निवडा आणि सेव्ह करा.
यानंतर तुम्ही WhatsApp वर टाकलेले प्रत्येक स्टेटस, फोटो किंवा व्हिडिओ एचडी क्वॉलिटीत दिसतील.
Instagram मध्ये उच्च गुणवत्ता अपलोड करण्यासाठी:
आपल्या प्रोफाइल फोटोवर टॅप करा.
वरच्या उजव्या बाजूस असलेल्या तीन रेषा (☰) आयकॉनवर क्लिक करा.
सेटिंग्ज → मीडिया क्वॉलिटी या पर्यायावर जा.
‘Upload at highest quality’ हा पर्याय सुरू करा.
यानंतर तुमच्या स्टोरीज आणि पोस्ट्स स्पष्ट आणि उत्कृष्ट दर्जाच्या दिसतील.

फोन कॅमेरा सेटिंग्जमध्ये बदल करा:
– कॅमेरामध्ये फोटो रेशियो 16:9 ठेवा.
– फोटो क्लिक करताना कमाल मेगापिक्सेल वापरा.
– व्हिडिओसाठी 4K 30fps किंवा 4K 60fps निवडा.
– व्हिडिओ स्टॅबिलायझेशन ऑन ठेवा.
– ग्रिड लाईन्स सुरू ठेवल्याने तुम्हाला परफेक्ट फ्रेमिंग मिळेल.
हेही वाचा :
Samsung ने लाँच केले स्मार्ट मेड इन इंडिया विंडफ्री कॅसेट एसी…
महिला डॉक्टर प्रकरणात सर्वात मोठा पुरावा पोलिसांच्या हाती…
श्रेयसच्या पोटात Spleen फुटलं… प्राणघातक दुखापत…