मूळ बीड जिल्ह्यातील आणि फलटण उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येने संपूर्ण राज्य हादरले आहे. अत्यंत प्रामाणिक, कर्तव्यनिष्ठ आणि पुढील शिक्षणासाठी प्रयत्नशील असलेल्या या तरुण डॉक्टरने (medical)अचानक जीवन संपवण्याचा धक्कादायक निर्णय घेतला. फलटणमधील एका हॉटेलमध्ये त्यांनी आत्महत्या केली असून, त्यांच्या हातावर लिहिलेल्या नोटमध्ये पीएसआय गोपाळ बदने याने चार वेळा बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच प्रशांत बनकर या व्यक्तीचंही नाव या प्रकरणात समोर आलं आहे.

संपदा मुंडे या प्रशांत बनकरच्या घरात किरायाने राहत होत्या. मात्र, घर असतानाही त्यांनी दोन दिवसांसाठी हॉटेल का बुक केले, हा प्रश्न पोलिसांसमोर उभा राहिला आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींचे तसेच पीडितेचे मोबाईल ताब्यात घेतले असून, त्यातून त्यांच्यातील वारंवार संपर्काचे पुरावे मिळाले आहेत. यावरून या तिघांमध्ये काहीतरी वैयक्तिक संबंध असल्याची शक्यता पोलिसांनी नाकारलेली नाही.
दरम्यान, या प्रकरणात एक मोठा पुरावा पोलिसांच्या हाती लागला आहे — तो म्हणजे संपदा मुंडे यांची वैयक्तिक डायरी. या डायरीत त्यांनी केवळ आत्महत्येपूर्वीची पोस्टमार्टेम नोटच नव्हे, तर स्वतःच्या खासगी आयुष्याविषयी अनेक गोष्टी लिहिल्या आहेत. पोलिसांनी ती डायरी जप्त केली असून, तिच्या तपासातून अनेक महत्वाचे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

साताऱ्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, डॉक्टर आणि आरोपी दोघेही एकमेकांच्या सतत संपर्कात होते. त्यांच्या संभाषणांचे आणि संदेशांचे विश्लेषण सुरू आहे. दरम्यान, संपदा मुंडे यांच्या कुटुंबीयांनी स्वतंत्र विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याची मागणी केली आहे, कारण या प्रकरणाला राजकीय वळण मिळाल्याचे दिसत आहे.या प्रकरणाचा तपास गतीमान झाला असून, पोलिसांनी (medical)मिळवलेल्या डायरीमधील नोंदी, मोबाईल डेटा आणि सीसीटीव्ही फूटेज यांच्या आधारे पुढील कारवाई होण्याची शक्यता आहे. आता या तरुण डॉक्टरला न्याय मिळवून देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या प्रकरणावर केंद्रीत झाले आहे.
हेही वाचा :
भरधाव कारची स्कूटरला धडक; महिला फरपटत गेली अन्… ; अपघात करुन चालकाने काढला पळ, Video Viral
राष्ट्रवादीचे कार्यालय की तमाशाचा फड?
सर्वसामान्यांना झटका! साखरेच्या दरात वाढ होणार?