पनवेलमध्ये घडलेल्या एका संतापजनक घटनेने पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला आहे. नवी मुंबईलगत असलेल्या पनवेलच्या धनसागर गावातील रियांश फार्म हाऊस येथे बाथरुममध्ये स्पाय कॅमेरा लावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी फार्महाऊसचा(farmhouse) मॅनेजर मनोज चौधरी (वय ३५) याला पोलिसांनी रंगेहात पकडून अटक केली असून, त्याच्यावर पॉक्सो कायद्यासह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेचं सत्य धक्कादायक आहे. मागच्या आठवड्यात एक कुटुंब पिकनिकसाठी रियांश फार्म हाऊसवर आलं होतं. रात्री दोनच्या सुमारास कुटुंबातील एका महिलेला वॉशरुममध्ये जाताना भिंतीच्या कोपऱ्यातून मिणमिणणारी लाइट दिसली. संशय आल्याने तिने नीट पाहिलं असता, तो लपवलेला स्पाय कॅमेरा असल्याचं तिला समजलं. ती थेट मॅनेजरच्या खोलीत गेली असता, तिच्या डोळ्यांसमोर आणखी धक्कादायक दृश्य आलं — मनोज चौधरी काही महिलांचे बाथरुममधील व्हिडिओ आपल्या मोबाईलवर पाहत होता.
महिलेने तत्काळ आपल्या नातेवाईकांना बोलावलं आणि तळोजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आणि त्याचा मोबाइल जप्त केला. तपासादरम्यान पोलिसांना १७ अश्लील व्हिडिओ सापडले, ज्यापैकी काही व्हिडिओंमध्ये अल्पवयीन मुली असल्याचा संशय आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण भगत यांनी सांगितले की, आरोपीने काही व्हिडिओ डिलीट केल्याची कबुली दिली असून, सायबर तज्ञांच्या मदतीने डिलीट डेटा रिकव्हर करण्याचे काम सुरू आहे.

या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आरोपीविरोधात पॉक्सो कायदा, आयटी अॅक्ट आणि भारतीय दंड संहितेतील विविध कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पनवेल(farmhouse) न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिस आता तपासत आहेत की, मनोज चौधरीने यापूर्वीही असे प्रकार केले आहेत का आणि हे व्हिडिओ कुठे अपलोड किंवा शेअर केले आहेत का.या घटनेनंतर नागरिकांमध्ये रोष पसरला असून, फार्महाऊस किंवा रिसॉर्टमध्ये राहणाऱ्यांनी आपली गोपनीयता सुरक्षित आहे का, याची खात्री करणे अत्यावश्यक असल्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे.
हेही वाचा :
Samsung ने लाँच केले स्मार्ट मेड इन इंडिया विंडफ्री कॅसेट एसी…
महिला डॉक्टर प्रकरणात सर्वात मोठा पुरावा पोलिसांच्या हाती…
श्रेयसच्या पोटात Spleen फुटलं… प्राणघातक दुखापत…