भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रँड सॅमसंगने(Samsung) आज नवीन मेड इन इंडिया स्‍मार्ट विंडफ्री कॅसेट एअर कंडिशनर्स लाँच केले आहे. नवीन लाइनअपमध्‍ये सर्वोत्तम कनेक्‍टीव्‍हीटी, पर्यावरणपूरक डिझाइन आणि प्रीमियम आरामदायीपणाचे संयोजन आहे, जे व्‍यावसायिक व निवासी कूलिंग सोल्‍यूशन्‍सच्‍या भविष्‍याला सुधारण्यासाठी मदत करणार आहे.

स्‍मार्ट नियंत्रण, कार्यक्षम कामगिरी आणि सुधारित स्‍वास्‍थ्‍य देण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आलेल्‍या नवीन श्रेणीमध्‍ये बिल्‍ट-इन वाय-फाय आणि सॅमसंगचे अद्वितीय विंडफ्री कूलिंग तंत्रज्ञान आहे, जे अधिक थंडाव्‍याशिवाय सतत आरामदायीपणा देते आणि भारतभरातील युजर्सना अधिक सोयीसुविधा व आरामदायीपणा देते. वापरण्‍यात आलेले पर्यावरणपूरक आर३२ रेफ्रिजरेण्‍ट शाश्वततेप्रती सॅमसंगच्‍या कटिबद्धतेची अधिक पुष्‍टी देते.

”आज आरामदायीपणा म्‍हणजे रूममध्‍ये फक्‍त थंडावा असण्‍यापर्यंत मर्यादित राहिले नसून अनुभव निर्माण करण्‍याबाबत आहे, जो सर्वोत्तम, शाश्वत असण्‍यासोबत भारतातील ग्राहकांच्‍या गरजांनुसार डिझाइन करण्‍यात आला आहे. आमचे नवीन विंडफ्री कॅसेट एसी अभिमानाने मेड इन इंडिया आहेत, तसेच डिझाइनची प्रीमियम आकर्षकता, पर्यावरणपूरक रेफ्रिजरेण्‍ट्सची खात्री आणि स्‍मार्टथिंग्‍ज कनेक्‍टीव्‍हीटीची सर्वोत्तमता देतात.

हे एसी शक्तिशाली कार्यक्षमतेसह दीर्घकाळापर्यंत (Samsung)स्‍वास्‍थ्‍य देण्‍यासाठी, ऊर्जा बचत करण्‍यासाठी, पर्यावरणावरील परिणाम कमी करण्‍यासाठी आणि आरामदायीपणाचा नवीन अनुभव देण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहेत. या लाँचसह आम्‍ही मापदंड स्‍थापित करत आहोत, जेथे एअर कंडिशनिंग स्‍मार्ट, हरित आणि देशातील व्‍यवसाय व ग्राहकांच्‍या सर्वसमावेशक जीवनशैलीनुसार अधिक सर्वोत्तम असतील,” असे सॅमसंग इंडियाच्‍या सिस्‍टम एसीचे प्रमुख विपिन अग्रवाल म्‍हणाले.

युजर्स बिल्‍ट-इन वाय-फायच्‍या माध्‍यमातून त्‍यांच्‍या कॅसेट एसींना सहजपणे सॅमसंग स्‍मार्टथिंग्‍ज अ‍ॅपसोबत कनेक्‍ट करू शकतात, ज्‍यासाठी अतिरिक्‍त मॉड्यूल्‍सची गरज भासत नाही. ते घरी असोत, ऑफिसमध्‍ये असोत किंवा बाहेर असोत प्रत्‍यक्ष त्‍यांच्‍या स्‍मार्टफेानमधून त्यांच्‍या घरातील वातावरणावर देखरेख ठेवू शकतात, व्‍यवस्‍थापन करू शकतात आणि वैयक्तिकृत करू शकतात.

सॅमसंग बिक्‍स्‍बी, अ‍ॅमेझॉन अ‍ॅलेक्‍सा किंवा गुगल असिस्‍टण्‍ट अशा वॉईसअसिस्‍टण्‍ट्सचा वापर करत तापमान व सेटिंग्‍जवर नियंत्रण ठेवते.फक्त काही मिनिटांत होईल FULL चार्ज! हे स्मार्टफोन्स देतात अविश्वसनीय स्पीड, यादी पाहून व्हाल थक्क, जीपीएस ट्रॅकिंगचा वापर करत तुम्‍ही घरी परतण्‍यापूर्वी पसंतीच्‍या सेटिंगनुसार घरामध्‍ये आपोआप थंडावा आणते.तुमच्‍या झोपेच्‍या चक्राशी जुळून जाते, तसेच जवळपास ४८ टक्‍के ऊर्जा बचत करते.तापमान व आर्द्रता सेन्‍सर्सचा वापर करत घरामध्‍ये स्थिर वातावरण राखते, तसेच ड्राय मोडमध्‍ये जवळपास १९ टक्‍के ऊर्जा बचत करते.

श्रेणी आर३२ रेफ्रिजेरण्‍टचा वापर करते, ज्‍याने समकालीन रेफ्रिजेरण्‍ट्सच्‍या तुलनेत ग्‍लोबल वॉर्मिंग पोटेन्शियल (जीडब्‍ल्‍यूपी) मोठ्या प्रमाणात कमी केले आहे. घरामध्‍ये शुद्ध वातावरणासाठी पर्यायी पीएम १.० फिल्‍ट्रेशन सिस्‍टम उपलब्‍ध आहे, जी अत्‍यंत सूक्ष्‍म धूळीकणांना कॅप्‍चर करते आणि हवेची शुद्धता वाढवते.गतीशीलपणे थंड हवेचे प्रसरण करणाऱ्या समकालीन एअर कंडिशनर्सच्‍या तुलनेत सॅमसंगचे विंडफ्री कूलिंग हजारो मायक्रो-होल्‍सचा (सूक्ष्‍म छिद्रांचा) वापर करत सौम्‍यपणे थंड हवा प्रसारित करते

यामुळे पंख्‍याच्‍या कमी गतीसह ‘स्टिल एअर’ वातावरण निर्माण होते आणि कोल्‍ड ड्राफ्ट्स दूर होते, सातत्‍यपूर्ण, शांतमय व ऊर्जा-कार्यक्षम कूलिंग राहते. एसींची ही श्रेणी कार्यालये, आदरातिथ्‍य आणि वेलनेस जागांसाठी अनुकूल आहेत.सॅमसंगचा नवीन स्‍मार्ट कॅसेट एसी ६५,००० रूपये (जीएसटी वगळून) या सुरूवातीच्‍या किमती उपलब्ध आहे आणि ऑक्‍टोबर २०२५ पासून भारतभरातील सॅमसंगच्‍या अधिकृत व्‍यावसायिक एसी चॅनेल सहयोगींच्‍या माध्‍यमातून उपलब्‍ध असेल.

हेही वाचा :

भरधाव कारची स्कूटरला धडक; महिला फरपटत गेली अन्… ; अपघात करुन चालकाने काढला पळ, Video Viral
राष्ट्रवादीचे कार्यालय की तमाशाचा फड?
सर्वसामान्यांना झटका! साखरेच्या दरात वाढ होणार?