हरयाणामधील रोहतक येथे असलेल्या महर्षी दयानंद विद्यापीठात घडलेली एक घटना संतापजनक ठरली आहे. मंगळवारी महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांना मासिक पाळीमुळे सुट्टीची विनंती केल्यावर पर्यवेक्षकाने अमानुष वर्तन केल्याचा आरोप समोर आला आहे. या प्रकरणामुळे विद्यापीठ परिसरात मोठा गोंधळ उडाला असून, संतप्त विद्यार्थी संघटनांनी आरोपी सुपरवायझरवर कठोर कारवाईची मागणी केली(supervisor).

मिळालेल्या माहितीनुसार, दोन महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांनी मासिक पाळीमुळे तब्येतीची तक्रार देत सुट्टीची मागणी केली होती. मात्र, त्यांचा पर्यवेक्षक त्यावर विश्वास ठेवण्यास तयार नव्हता. उलट, त्याने त्या महिलांना “कपडे काढून तपासणी करून दाखवा” अशी अमानुष मागणी केली. इतकेच नाही, तर एका महिला सुरक्षा रक्षकाच्या माध्यमातून ही तपासणी करण्याचे आदेश दिले. महिलांनी या अपमानास्पद मागणीला नकार दिल्यावर सुपरवायझरने(supervisor) त्यांच्याशी शिवीगाळ आणि मारहाण केली असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

घटनेनंतर इतर स्वच्छता कर्मचाऱ्यांनी आणि विद्यार्थी संघटनांनी संताप व्यक्त करत आंदोलन सुरू केले. विद्यापीठ प्रशासनाविरुद्ध घोषणाबाजी करण्यात आली. वाढत्या दबावानंतर विद्यापीठाचे कुलसचिव के. के. गुप्ता यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि घटनेची चौकशी सुरू करण्याचे आदेश दिले.

गुप्ता यांनी सांगितले की, “विद्यापीठात महिलांविरुद्ध होणाऱ्या कोणत्याही गैरप्रकाराला माफी दिली जाणार नाही. संबंधित सुपरवायझरला तत्काळ निलंबित करण्यात आले असून, चौकशीनंतर दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.”या घटनेने संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली असून, महिला संघटनांनीही विद्यापीठ प्रशासनाकडे कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. समाजमाध्यमांवरही या घटनेचा तीव्र निषेध होत आहे.

हेही वाचा :

Samsung ने लाँच केले स्‍मार्ट मेड इन इंडिया विंडफ्री कॅसेट एसी…
महिला डॉक्टर प्रकरणात सर्वात मोठा पुरावा पोलिसांच्या हाती…
श्रेयसच्या पोटात Spleen फुटलं… प्राणघातक दुखापत…