भारताचा संघ आजपासून टी20 मालिका ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना दिसणार आहे. टीम इंडियाला कांगारुच्या संघाविरुद्ध एकदिवसीय मालिकेमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. आता सुर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारताचा संघ आजपासून खेळताना दिसणार आहे. सूर्यकुमार यादवची आई श्रेयस अय्यरसाठी प्रार्थना (prays)करत आहे, भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज श्रेयस अय्यर सिडनी येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात झेल घेताना जखमी झाला. दुखापत गंभीर होती आणि त्याला काही काळ आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अय्यरच्या दुखापतीबद्दल अपडेट दिले आहे आणि त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले आहे. दुसरीकडे, छठपूजेदरम्यान भारतामध्ये अनेक ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये सण साजरा करण्यात आला, महिलांनी सजून त्याच्या मुलासाठी ही पुजा(prays) केली. आईसाठी तिची सर्व मुले ही सारखीच असतात हे मात्र खरे. सूर्यकुमार यादवच्या आईने श्रेयस अय्यरच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना केली, ज्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हिडिओमध्ये, टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवची आई श्रेयसच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करत असल्याचे दिसून येते. “श्रेयस अय्यरला पोटात गंभीर दुखापत झाली ज्यामुळे अंतर्गत रक्तस्त्राव झाला. दुखापतीची त्वरित ओळख पटली आणि उपचारानंतर लगेचच रक्तस्त्राव थांबला. त्याची प्रकृती आता स्थिर आहे आणि त्याला निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. मंगळवारी केलेल्या पुनरावृत्ती स्कॅनमध्ये त्याच्या दुखापतीत लक्षणीय सुधारणा दिसून आली आहे. बोर्डाची वैद्यकीय टीम, सिडनी आणि भारतातील तज्ञांशी सल्लामसलत करून, त्याच्या प्रगतीवर लक्ष ठेवत राहील,” असे बीसीसीआयने एका निवेदनात म्हटले आहे.

श्रेयसची दुखापत सुरुवातीला बरगड्यांच्या दुखापतीमुळे झाल्याचे बोर्डाने म्हटले आहे, परंतु दुखापत अपेक्षेपेक्षा जास्त गंभीर होती. स्कॅनमध्ये प्लीहाला दुखापत झाल्याचे दिसून आले, ज्यामुळे अय्यरला सिडनी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात (आयसीयू) दाखल करण्यात आले. अय्यर आता आयसीयूबाहेर आहे. श्रेयस अय्यरला यापूर्वी बराच काळ दुखापत झाली आहे आणि तो लवकरच या दुखापतीतून बरा होऊन क्रिकेट मैदानात परतण्याची अपेक्षा आहे.

हेही वाचा :

नशीब पूर्णपणे बदलण्याआधी मिळतात हे 4 संकेत…
चक्रीवादळाचा धोका हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा…
शिंदे गटाला मोठा हादरा, ‘हा’ नेता भाजपमध्ये जाणार…