इंडियन प्रीमियर लीग या जगप्रसिद्ध टी 20 लीगला येत्या काही महिन्यात सुरुवात होणार आहे. नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत सर्व फ्रेंचायझींना आगामी सीजनसाठीच्या मिनी ऑक्शनपूर्वी त्यांच्या संघातील रिटेन आणि रिलीज खेळाडूंची लिस्ट जाहीर करायची आहे. मात्र सध्या एक माहिती समोर आली असून यामुळे मुंबई इंडियन्सचे (Mumbai Indians) चाहते फार नाराज होऊ शकतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार मुंबई इंडियन्सला तब्बल 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकवून देणारा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) हा मुंबई इंडियन्सची साथ सोडू शकतो.

सूत्रांच्या माहितीनुसार मुंबई इंडियन्स रोहित शर्माला(Rohit Sharma) रिलीज करू शकते. तर काही फ्रेंचायझी या रोहितला आपल्या संघात घेण्यासाठी उत्सुक आहेत. सध्या ही चर्चा होण्याचं कारण अभिषेक नायर आहे. रोहित शर्माचा जवळचा मित्र अभिषेक नायर हा कोलकाता नाईट रायडर्सचा हेड कोच बनणार आहे. लवकरच फ्रेंचायझी या संदर्भात घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यानंतर असं म्हटलं जातंय की रोहित शर्मा हा केकेआर सोबत पुढील सीजनमध्ये खेळताना दिसू शकतो.

रोहित शर्मा हा मागील अनेक वर्षांपासून मुंबई इंडियन्समधून खेळतोय मागील दोन वर्ष सोडती तर त्यापूर्वी त्याने संघाचं नेतृत्व केलं होतं. कोलकाता नाईट रायडर्सला सध्या नेतृत्वाची गरज आहे. परंतु मुंबई इंडियन्स रोहितला रिलीज करण्यापूर्वी बऱ्याच गोष्टींबाबत विचार करेल. कारण यापूर्वी आयपीएल 2024 मध्ये त्यांनी रोहितला बाजूला करून हार्दिक पंड्याला कर्णधार केलं होतं त्यावेळी मुंबई इंडियन्सला मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगला समोर जावं लागलं होतं. रोहित शर्मा मागील अनेक वर्ष मुंबईसाठी खेळत असल्याने त्याचं तेथील स्थान कायम आहे. पण कोलकाता नाईट रायडर्समध्ये आल्यास त्याला पुन्हा संघात आपलं नवं स्थान मिळवावं लागेल.

आयपीएल 2024 चं विजेतेपद पटकावणारा केकेआरचा संघ आयपीएल 2025 मध्ये प्लेऑफमध्ये सुद्धा स्थान मिळवू शकला नव्हता. त्यांचा परफॉर्मन्स बराच ढासळला. आयपीएल 2025 मध्ये संघाच्या खराब कामगिरीनंतरन हेड कोच चंद्रकांत पंडित आणि केकेआर वेगळे झाले. वर्ष 2018 पासून अभिषेक नायर हा कोलकाता नाइट राइडर्सच्या मॅनेजमेंटचा भाग होता. नायरने 2018 ते 2024 पर्यंत असिस्टेंट कोच म्हणून भूमिका बजावली. आयपीएल 2024 मध्ये जेव्हा संघाने हा खिताब जिंकला तेव्हा अभिषेक नायर हे कोचिंग स्टाफचा भाग होता. 2024 मध्ये जेव्हा तो टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये असिस्टेंट कोच म्हणून सामील झाला तेव्हा त्याला केकेआर सोडावे लागले. तो 10 महिन्यांपेक्षा कमी कालावधीत केकेआरमध्ये परतणार आहेत. आता तो केकेआरचा हेड कोच म्हणून दिसेल.

हेही वाचा :

चक्रीवादळाचा धोका हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा…

मोबाईल युजर्ससाठी आनंदाची बातमी! अनोळखी नंबरसह आता दिसणार कॉलरचे नाव

शिंदे गटाला मोठा हादरा, ‘हा’ नेता भाजपमध्ये जाणार…