‘मोंथा’ चक्रीवादळाने देशाच्या पूर्व किनारपट्टीवर मोठे संकट आणले आहे. बुधवारी रात्री आंध्र प्रदेशात धडकलेल्या या वादळाने मोठे नुकसान केले असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. आता याचा प्रभाव महाराष्ट्रासह अनेक राज्यांवर पुढील तीन दिवस दिसणार असून, हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा(warning) दिला आहे.बुधवारी रात्री ‘मोंथा’ चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या मछलीपट्टणम किनारपट्टीवर धडकले. यावेळी वाऱ्याचा वेग ताशी ९० ते १०० किलोमीटर इतका प्रचंड होता. या तीव्रतेमुळे आंध्र प्रदेश आणि ओडिशा या राज्यांना मोठा फटका बसला आहे. प्रशासनाने आधीच इशारा दिल्याने किनारपट्टी भागातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले होते, मात्र तरीही मोठे नुकसान झाले.

वादळाच्या तडाख्याने एकट्या आंध्र प्रदेशातच सुमारे ३८,००० हेक्टरवरील उभी पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. अनेक घरांचेही मोठे नुकसान झाले असून, अनेक भागात वीजपुरवठा खंडित झाला आहे आणि रस्त्यांवर झाडे उन्मळून पडली आहेत. प्रशासनाकडून मदतकार्य आणि रस्त्यांवरील अडथळे दूर करण्याचे काम सुरू असले तरी जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.चक्रीवादळाचा फटका केवळ जमिनीवरील मालमत्तेलाच बसला नाही, तर वाहतूक व्यवस्थेवरही मोठा परिणाम झाला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सुमारे १२० रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच, विशाखापट्टणम विमानतळावरून ३२ आणि विजयवाडा विमानतळावरून १६ नियोजित उड्डाणे रद्द करावी लागली, ज्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ‘मोंथा’चा प्रभाव पुढील तीन दिवस कायम राहणार आहे. यामुळे महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, छत्तीसगड, मध्य प्रदेश, झारखंड आणि राजस्थान या राज्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली असून, किनारपट्टीवर जोरदार वारे वाहत आहेत (काही ठिकाणी ताशी ५५ किमी वेगापर्यंत). वादळाची तीव्रता हळूहळू कमी होत असली तरी, पुढील काही तास महत्त्वाचे आणि धोकादायक(warning) असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
हेही वाचा :
शिंदे गटाला मोठा हादरा, ‘हा’ नेता भाजपमध्ये जाणार…
उद्धव ठाकरे गटाचा मोठा निर्णय; ज्येष्ठ नगरसेवकांचा पत्ता कट होणार
सोने 3500, तर चांदी 4 हजार रुपयांनी उतरली…