मागील दोन दिवसांपासून मुंबई, नवी मुंबई आणि इतर महाराष्ट्रात पावसाची संततधार कोसळत आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान सुद्धा झालंय. आता या पावसाचा फटका गुरुवार 30 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सेमी फायनलला सुद्धा बसण्याची शक्यता आहे. 26 ऑक्टोबर रोजी महिला वर्ल्ड कपचा शेवटचा(semi-final) सामना भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात याच डीवाय पाटील स्टेडियमवर पार पडला होता. पावसामुळे हा सामना रद्द करण्यात आला होता.आता गुरुवारी डीवाय पाटील स्टेडियमच्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यावर सामन्यावर सुद्धा पावसाचं सावट असल्याने हा सामना रद्द केला जाऊ शकतो. अन्यथा पाऊस थांबल्यास कमी ओव्हर्सचा सामना खेळवण्याबाबत विचार केला जाऊ शकतो.

मात्र एकंदरीत पावसामुळे सेमी फायनलच्या या महामुकाबल्याचा रोमांच थोडा कमी होईल. तसेच सामना कमी ओव्हर्सचा खेळावा लागल्यास दोन्ही संघाच्या खेळाडूंना कोणतीही चूक करून चालणार नाही.पावसाच्या शक्यता लक्षात घेऊन आयसीसीने या सेमी फायनल सामन्यासाठी 31 ऑक्टोबर हा राखीव दिवस म्हणून ठेवला आहे. म्हणजेच जर सामना गुरुवारी पूर्ण होऊ शकला नाही, तर शुक्रवारी तो खेळवला जाईल.आयसीसीच्या नियमांनुसार, नाणेफेक झाल्यानंतरच नॉकआउट सामना ‘लाइव्ह’ मानला जाईल. जर प्रत्येक डावात किमान 20 ओव्हरचा खेळ पूर्ण होऊ शकला नाही, तर सामना राखीव दिवसासाठी पुढे जाईल.

मात्र दुर्दैवाची गोष्ट अशी की 31 ऑक्टोबरला सुद्धा नवी मुंबईत 90 टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे जर रिजर्व डे च्या दिवशी सुद्धा सामना रद्द करण्याची वेळ आली तर ऑस्ट्रेलियाचा संघ वर्ल्ड कप फायनलसाठी क्वालिफाय करेल.ऑस्ट्रेलियाने लीग टप्प्यात सातपैकी सहा सामने(semi-final) जिंकले, तर श्रीलंकेविरुद्धचा एक सामना पावसामुळे रद्द झाला होता. ते पॉइंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावर होते. टीम इंडियाच्या संघाने वर्ल्ड कपमध्ये 3 सामने जिंकले, तर 3 सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला. यातील एक सामना अनिर्णित राहिला, ज्यामुळे संघ पॉइंट टेबलमध्ये चौथ्या स्थानावर राहिला. जर रिजर्व डेच्या दिवशी सामना रद्द झाला तर पॉईंट्स टेबलमध्ये प्रथम क्रमांकावर असणारा संघ फायनलमध्ये पोहोचेल.

हेही वाचा :

30 वर्षांनंतर ‘या’ राशींवर शनिदेव झाले प्रसन्न 5 डिसेंबरपर्यंत सोन्याचे दिवस
कॉटन कपडे धुताना रंग उडू नयेत यासाठी फॉलो करा ‘या’ खास टिप्स…
महिलेने अर्धनग्न अवस्थेतच इमारतीवरून मारली उडी, ‘त्या’ खोलीत काय सापडलं?