ओपनएआयने आपल्या लोकप्रिय एआय साधनाबद्दल एक मोठी घोषणा केली आहे. कंपनीने जाहीर केले आहे की ChatGPT Go सबस्क्रिप्शन आता सर्व वापरकर्त्यांसाठी (users)तब्बल एक वर्षासाठी मोफत उपलब्ध होणार आहे. यामुळे कोणत्याही प्रकारचा खर्च न करता वापरकर्ते ChatGPT चे प्रीमियम फीचर्स उपभोगू शकणार आहेत. सामान्यतः या प्लॅनची किंमत दर महिन्याला 399 रुपये असून वार्षिक खर्च सुमारे 4,788 रुपये इतका होता. मात्र, ओपनएआयच्या या नव्या ऑफरमुळे आता वापरकर्त्यांना हा प्लॅन पूर्णपणे विनामूल्य मिळणार आहे.

मोफत ChatGPT Go सबस्क्रिप्शन सक्रिय करण्याची प्रक्रिया देखील अत्यंत सोपी आहे. वापरकर्त्यांनी आपल्या स्मार्टफोन किंवा लॅपटॉपवर ChatGPT अॅप डाउनलोड करून लॉगिन करावे. त्यानंतर प्रोफाइल आयकॉनवर क्लिक करून “Upgrade Plan” किंवा “Settings → Subscription → ChatGPT Go” हा पर्याय निवडावा. स्क्रीनवर दाखवलेल्या सूचनांचे पालन केल्यानंतर हा प्लॅन तुमच्या खात्याशी जोडला जाईल आणि तुम्ही लगेच त्याचा वापर सुरू करू शकता.

या सबस्क्रिप्शनमुळे वापरकर्त्यांना(users) OpenAI च्या मुख्य मॉडेलचा जलद आणि अचूक प्रतिसाद मिळणार आहे. तसेच अधिक फोटो जनरेट करणे, विविध प्रकारच्या फाइल्सवर काम करणे आणि डेटा अ‍ॅनालिसिससाठी Python चा वापर करणे आता अधिक सुलभ होणार आहे.ओपनएआयनं स्पष्ट केलं आहे की, API सेवांचे बिलिंग स्वतंत्रपणे केले जाईल, तसेच GPT-4o आणि GPT-4 Turbo सारखी काही जुनी मॉडेल्स या प्लॅनमध्ये समाविष्ट नाहीत. व्हिडिओ जनरेशनसाठीचा Sora फीचर सध्या केवळ Plus आणि Pro वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे.एकूणच, ChatGPT Go च्या या मोफत ऑफरमुळे एआयचा वापर सर्वसामान्यांसाठी अधिक सोपा आणि सुलभ होणार असून, कामकाज, शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात यामुळे मोठी क्रांती घडण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

जुळ्या मुलांचा रंग पाहून गोऱ्यागोमट्या नवऱ्याने रुग्णालयात घातला राडा, बायको हादरली; Video Viral
एक्स्ट्रा क्लासच्या नावाखाली दोन मुलींना बोलावलं आणि…शिक्षकानेच….
महाराष्ट्रात मिळणार मोफत वीज, ‘रूफ टॉप’ योजना जाहीर