वरळी डोम येथे शनिवारी भूतपूर्व उत्साहात आणि गर्दीत ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा संपन्न झाला.(journey)राज आणि उद्धव यांचे तब्बल वीस वर्षानंतर खऱ्या अर्थाने मनोमिलन झाले. यापूर्वी संधी मिळेल तेव्हा ठाकरे शैलीत अनेक विशेषणे लावून एकमेकांवर जहाल आणि जहरी टीका करणाऱ्या या ठाकरे बंधूंनी या मेळाव्यात एकमेकांचा सन्माननीय या शब्दात उल्लेख करून झाले गेले विसरून गेलो आहे याचे संकेत तर दिलेच शिवाय येथून पुढची आम्हा दोघांची राजकीय वाटचाल युवतीच्या माध्यमातूनच होईल हे सुद्धा अप्रत्यक्षरीत्या स्पष्ट केले आहे. त्यामुळे त्यांच्यातील युतीची घोषणा हा एक केवळ आता उपचार ठरणार आहे. राज यांचे भाषण संयत होते तर उद्धव ठाकरे यांचे भाषण आक्रमक होते. या विजयी मेळाव्याकडे काँग्रेस नेत्यांनी पाठ फिरवली होती.

या मेळाव्याचे एकूण स्वरूप “ठाकरे एके ठाकरे”असेच होते.राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, शेतकरी कामगार पक्षाचे जयंतराव पाटील, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड प्रकाश रेड्डी, महादेव जानकर वगैरे या विजयी मेळाव्याला उपस्थित होते पण त्यांना व्यासपीठावर स्थान नव्हते. व्यासपीठावर राज व उद्धव यांच्यासाठी दोनच खुर्च्या होत्या. पक्ष विरहित हा मेळावा असल्याने कोणत्याही राजकीय पक्षाचे झेंडे आणि फलक नव्हते. राज ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे अंगावर भगवी शाल लपेटलेली नव्हती. निळ्या रंगाची शान मकरंद सारखी वापरली होती. या मेळाव्याला राजकीय रंग नव्हता पण उबाठा व मनसेच्या सैनिकांनी प्रचंड गर्दी केली होती. (journey)अन्य राजकीय पक्षांचे नेते होते पण कार्यकर्ते नव्हते. ठाकरे बंधू एकत्र आले याचेच जास्त कौतुक उपस्थितांना होते. त्याचाच जल्लोष या मेळाव्यात दिसत होता.
राज ठाकरे यांचे संपूर्ण भाषण मराठीच्या मुद्द्यावर होते. त्यांनी भाषणात राजकीय आशय आणला नाही. आम्ही दोघांना एकत्र आणणं हे बाळासाहेबांना जमलं नाही पण ते देवेंद्र फडणवीस यांना जमलं. देशात भाषा सूत्रच नाही. कोर्टात इंग्रजी चालतं. त्रिभाषा सूत्र आणलं कुठून? आणि त्याचा प्रयोग महाराष्ट्रावरच का? मुंबई स्वतंत्र होते का याची चाचपणी हिंदी भाषा लादून केली जाते का? मराठी माणसांनी रक्त सांडून मुंबई मिळवली आहे. तिला हात लावण्याचे धाडस करू नका. आमची मुले इंग्रजी शाळेत शिकली. त्यात गैर काय? त्याचा मराठी अस्मितेशी संबंध का जोडला जातो? असे काही सवाल राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात उपस्थित केले. इसवी सन 1999 मध्ये पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजप युती सत्तेत येऊ शकत होती पण सुरेश दादा जैन यांचे मुख्यमंत्री पदासाठी नाव पुढे आणलं जातंय हे लक्षात येतात बाळासाहेबांनी मुख्यमंत्री हा मराठीत असला पाहिजे अशी भूमिका घेतली होती.
असेही राज यांनी सांगताना सुरेश दादा जैन हे मुख्यमंत्री होणार होते ही नवी माहिती महाराष्ट्राच्या आजच्या पिढीला दिली. बाळासाहेब आणि माझे वडील श्रीकांत हे सुद्धा इंग्रजी माध्यमात शिकले होते म्हणून काही त्यांनी मराठीशी तडजोड केली नाही. राज ठाकरे यांचे भाषण हे मराठी भाषा या विषयावर फोकस करणारे होते त्यांनी राजकारणावर भाष्य केले नाही. आम्ही बंधू एकत्र आलो आहोत. आता तुमची सत्ता विधानभवनात आमची सत्ता आहे ती रस्त्यावर.(journey) मराठी मुद्द्यावर त्यांची चूक असेल तर कानाखाली आवाज काढा पण त्याचे व्हिडिओ काढू नका असे आवाहनही राज ठाकरे यांनी करून मराठीशी तडजोड नाही, पण इतर भाषांना आमचा विरोध नाही असा राज्य शासनाला इशारा दिला. पण त्यांनी कोणाचे नाव घेऊन किंवा विद्यमान राजकारणावर कोणत्याही प्रकारचे भाष्य केले नाही.
उद्धव ठाकरे यांनी मात्र मराठी भाषेला केंद्रस्थानी ठेवून राजकीय भाषण केले. नरेंद्र मोदी, अमित शहा, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्यासाठी” मराठी ” चे व्यासपीठ वापरले. मी आणि राज यांच्यामध्ये”अंतर”पाट होता, तो अनाजी पंतांनी देवेंद्र फडणवीस दूर केला अशी खोचक टिका केली. आम्ही एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठीच. आम्ही “म”म्हणजे महापालिका यासाठी नव्हे तर म म्हणजे महाराष्ट्रासाठी एकत्र आलो आहोत हे त्यांचे विधान म्हणजे येथून पुढे किंवा आजपासूनच दोघे राजकीय दृष्ट्या एकत्र आलो आहोत येत आहोत. आमची राजकीय युती झाली असे या प्रत्यक्षपणे सांगून टाकले. वापरा आणि फेकून द्या या तुमच्या वृत्तीला फेकून देण्यासाठी आम्ही दोघे एकत्र आलो आहोत. हे सांगण्यास ते विसरले नाहीत. ठाकरे बंधूंची राजकीय ताकद त्यांनी या निमित्ताने बोलून दाखवली.
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र आले हे निमित्त ठरलं असले तरी मराठी माणसाची विशेषतः दोन्हीकडे विभागलेल्या शिवसैनिकांची बऱ्याच वर्षापासूनची ती इच्छा होती. कोणत्या ना कोणत्या कारणे असेना पण हे बंधू एकत्र आले याचाच आनंद त्यांना अधिक होता आणि तो हिंदी सक्ती मागे घेतल्याबद्दल झालेल्या आनंदापेक्षा निश्चितच जास्त होता. आदित्य आणि अमित ठाकरे ही युवा पिढी भविष्यात हे ऐक्याचा सूत्र कायम ठेवतील हे सुद्धा यानिमित्ताने सुचित केले गेले. एकूणच ठाकरे बंधू आणि त्यांच्या कुटुंबातील कटुता विजयी मेळाव्यामुळे संपली. त्यांचे मनोमिलन झाले आहे मतभेद आणि मनभेदही संपले आहेत हा संदेश विजयी मेळाव्यातून ठाकरे बंधूंनी महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेला दिला आहे असे म्हणता येईल.
राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यांचा मराठीचा मुद्दा राष्ट्रीय पातळीवरील काँग्रेस पक्षाला रुचणारा नव्हता. त्यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या काही कार्यकर्त्यांनी हिंदी भाषिक व्यापाऱ्यांना मारहाण केली होती. हिंदी भाषिकांनी एकत्र येऊन त्या विरोधात मोर्चा काढला होता. आणि म्हणूनच काँग्रेसला या विजयी मेळाव्यात हजेरी लावणे अडचणीचे होते. राज ठाकरे यांच्या भूमिकेला काँग्रेसने यापूर्वी कधीही पाठिंबा दिलेला नाही. त्यामुळे या विजयी मेळाव्याला हजेरी लावली तर त्यांच्या भूमिकेला आपले समर्थन आहे असा मेसेज हिंदी भाषिकामध्ये जाईल याची भीती वाटल्यामुळेच काँग्रेसचे महाराष्ट्रातील नेते या मेळाव्याकडे फिरकले नाहीत.
हेही वाचा :
सकाळच्या नाश्त्यात १० मिनिटांमध्ये झटपट बनवा खमंग कोथिंबीर पराठा, नाश्ता होईल पोटभर
धबधब्याच्या काठावर उभा राहून गर्लफ्रेंडला प्रोपोज करत होता, तितक्यात पाय घसरला अन्…Video
‘…तर तुझ्या पत्नीला माझ्या घरी आणून सोड’; दुकानदाराने सावकाराच्या जाचाला कंटाळून जीवन संपवलं