महाराष्ट्र राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने शिष्यवृत्ती(scholarships) परीक्षेच्या रचनेत मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. २०१६ नंतर प्रथमच हा बदल होत असून, यामुळे उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा आर्थिक लाभ होणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी याच शैक्षणिक वर्षापासून होत आहे, ज्यामुळे हजारो विद्यार्थ्यांना फायदा होईल.

२०१६ सालापूर्वी, ही शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता चौथी आणि सातवीसाठी घेतली जात होती. मात्र, २०१६ मध्ये यात बदल करून ती पाचवी आणि आठवीसाठी आयोजित करण्यास सुरुवात झाली. परंतु, या बदलामुळे परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत मोठी घट झाल्याचे निदर्शनास आले होते, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

ही बाब लक्षात घेऊन, शालेय शिक्षण विभागाने आता पुन्हा जुन्या पद्धतीप्रमाणे चौथी आणि सातवीच्या वर्गांसाठीच परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. हा नवीन नियम पुढील वर्षापासून पूर्णपणे लागू होईल. पण, हा बदल या वर्षापासूनच सुरू होत असल्याने, यंदा (2025-26) चौथी, पाचवी, सातवी आणि आठवी अशा चारही वर्गांसाठी ही परीक्षा आयोजित केली जाणार आहे.

या नवीन निर्णयासोबतच शिष्यवृत्तीच्या(scholarships) रकमेतही वाढ करण्यात आली आहे. शासनाच्या निर्णयानुसार, चौथीच्या वर्गातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रति महिना ५०० रुपये, म्हणजेच वार्षिक ५,००० रुपये शिष्यवृत्ती दिली जाईल. सातवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी ही रक्कम प्रति महिना ७५० रुपये, म्हणजेच वार्षिक साडेसात हजार रुपये (₹7,500) इतकी असेल.

शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना मंजुरी मिळाल्यानंतर, पुढील तीन वर्षांसाठी ही रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल. या शैक्षणिक वर्षासाठी, इयत्ता पाचवी आणि आठवीची परीक्षा फेब्रुवारी २०२६ मध्ये, तर इयत्ता चौथी आणि सातवीची परीक्षा एप्रिल-मे २०२६ मध्ये घेण्याचे नियोजन आहे. यासाठीचा शासन निर्णय निर्गमित झाला असून, अर्ज प्रक्रियाही सुरू झाली आहे.

हेही वाचा :

गौरवाड ता. शिरोळ येथे दिवाळीनिमित्त भव्य किल्ला स्पर्धा संपन्न
सोनं-चांदीच्या दरात आज मोठा उलटफेर; वाचा आजचे 22 कॅरेटचे दर
दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, परिक्षेआधी मोठा निर्णय