गौरवाड (ता. शिरोळ) – दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गौरवाड परिसरातील सात गावांनी एकत्र येऊन भव्य “किल्ला स्पर्धा” आयोजित केली होती(competition). या अनोख्या उपक्रमात नदीपलीकडील सात गावांतील तब्बल 55 मंडळांनी सहभाग नोंदवला. स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पार्टी कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष श्री. राजवर्धन नाईक निंबाळकर उपस्थित होते. त्यांच्या सोबत भारतीय जनता पक्षाचे नेते सावकारजी मदनाईक, मंडलाध्यक्ष अरविंद माने, महेशजी देवताळे, विजय कुंभोजे, प्रशांत कुंभोजी, आदिनाथ आरवाडे, महावीर तकडे, प्रवीण चुरमुंगे, सुधीर शहापुरे, जयपाल कुंभोजे, अन्वरभाई जमादार तसेच भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते आणि सात गावांतील स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात मान्यवरांनी किल्ला स्पर्धेत सहभागी सर्व स्पर्धकांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या कलात्मकतेचे कौतुक केले. राजवर्धन नाईक निंबाळकर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, त्यांची दूरदृष्टी आणि राष्ट्रनिर्मितीची तळमळ आजच्या युवा पिढीने आत्मसात करणे गरजेचे आहे. किल्ला स्पर्धा हे केवळ एक सांस्कृतिक आयोजन नसून इतिहासाची जाणीव आणि संस्कृतीचा वारसा पुढे नेण्याचे प्रभावी माध्यम आहे.

कार्यक्रमाचे संयोजक आणि आयोजक मंडळांनी उत्कृष्ट नियोजनातून स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण केली. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे सर्व स्तरांवर कौतुक करण्यात आले.समारोप प्रसंगी सर्व मान्यवरांनी आवाहन केले की, प्रत्येक वर्षी अशाच प्रकारच्या किल्ला स्पर्धा आयोजित करून नव्या पिढीला इतिहास समजावून सांगण्याचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा जपण्याचे कार्य आपण सर्वांनी मिळून करावे. कार्यक्रमानंतर विजेत्यांना सर्टिफिकेट, ट्रॉफी आणि आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. सर्व स्पर्धकांना प्रशस्तिपत्र देऊन त्यांचा उत्साह (competition)वाढविण्यात आला.
हेही वाचा :
सोनं-चांदीच्या दरात आज मोठा उलटफेर; वाचा आजचे 22 कॅरेटचे दर
दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, परिक्षेआधी मोठा निर्णय
सारा तेंडुलकर स्क्रिनवर दिसली अन् शुभमन… काय घडलं? पाहा Video