भारतीय क्रिकेट संघाचा युवा स्टार फलंदाज शुभमन गिल सध्या फारशा चांगल्या फॉर्ममध्ये नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेत त्याला पुन्हा अपयशाचा सामना करावा लागला आहे. तिसऱ्या सामन्यातही त्याची बॅट शांत राहिली आणि तो कमी धावसंख्येवर माघारी परतला. एकदिवसीय मालिकेत अपयशी ठरलेला गिल टी-20 मालिकेतील तीनपैकी दोन सामन्यांमध्येही अपेक्षेप्रमाणे खेळ दाखवू शकला नाही. विशेष म्हणजे, होबार्ट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात सारा तेंडुलकर प्रेक्षकांच्या गॅलरीत उपस्थित होती आणि तिचा चेहरा स्क्रीनवर(screen) दिसताच पुढच्याच चेंडूवर शुभमन गिल LBW झाला, ही गोष्ट चर्चेचा विषय ठरली.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 187 धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारताच्या डावाची सुरुवात अभिषेक शर्माने जोरदार केली, मात्र तो लवकर बाद झाला. त्यानंतर शुभमन गिल आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांच्यावर संघाचा भार आला. सूर्यकुमारने षटकाराने आपला सूर जाहीर केला, तर गिलनेही चौकार मारत खेळ उभा करण्याचा प्रयत्न केला. पण गिलने चौकार मारल्यानंतर लगेचच स्टेडियमच्या स्क्रीनवर (screen)सारा तेंडुलकरचा चेहरा झळकला, आणि त्यानंतर पुढच्याच चेंडूवर तो LBW झाला.
Sara Tendulkar's reaction to Shubman Gill's boundary 😀 pic.twitter.com/lVlJ9MRQea
— Stupid_Opinions (@IAmCricketGeek) November 2, 2025
सारा आणि शुभमन यांच्यातील अफेअरच्या चर्चा पूर्वीपासूनच सुरू आहेत. वर्ल्डकप 2023 दरम्यान तसेच मेलबर्न कसोटीत साराने स्टेडियममध्ये हजेरी लावल्यामुळे त्या दोघांच्या नात्याबद्दल पुन्हा अफवा पसरल्या होत्या. कालच्या सामन्यानंतर या चर्चांना पुन्हा एकदा हवा मिळाली आहे.गिलला या सामन्यात नॅथन एलिसने बाद केले, आणि तो 12 चेंडूत केवळ 15 धावा करून परतला. या कामगिरीनंतर गिलच्या टी-20 फॉर्मबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

2025 च्या आशिया कपनंतर पुनरागमन केल्यापासून गिलला सलग 10 डावांमध्ये एकही अर्धशतक झळकावता आलेले नाही. त्याचा सर्वोच्च स्कोअर 47 धावा असून, तोही पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात झाला होता.सध्या शुभमन गिलवर फॉर्ममध्ये परतण्याचा दबाव वाढला आहे, आणि त्याच्याकडून आगामी मालिकांमध्ये दमदार पुनरागमनाची अपेक्षा केली जात आहे.
हेही वाचा :
ऐश्वर्या राय बच्चनचे या सेलिब्रिटींसोबत आहे 36 चा आकडा
‘…तर कंत्राटदाराला दंड ठोठावणार’; सरकारचा मोठा निर्णय
अमानवी कृत्यामुळे महाराष्ट्र हादरला,गतिमंद मुलांना अमानुष मारहाण..