छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मांडकी गावातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. चैतन्य कानिफनाथ निवासी गतिमंद विद्यालयात गतिमंद मुलांना(Children) अमानुष मारहाण करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल आला आहे. या अमानवी कृत्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. संबधितांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

या व्हायरल व्हिडिओत शिपाई एका लहान मुलाला(Children) बेदम मारहाण करताना दिसत आहे. विद्यार्थ्याचे हात पाय बांधून त्याला कुकरच्या झाकणाने माहणार केल्याचंही या व्हिडिओत दिसत आहे. तसंच केअर टेकरनेही मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेचं सीटीटीव्ही फुटेज पोलिसांकडे जमा करण्यात आले आहे. याप्रकरणी चिखलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिलेल्या तक्रारीनुसार मारहाण करणारा आरोपी प्रदीप देहाडे हा विद्यार्थ्यांच्या छातीवर पाय ठेवून त्यांना मारहाण करत असल्याचं म्हटल आहे.

या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडे जमा करण्यात आले आहेत. तक्रारीनुसार सीसीटीव्ही फुटेजमध्ये मारहाण करणारा आरोपी प्रदीप देहाडे हा विद्यार्थ्यांच्या छातीवर पाय ठेवून त्यांना मारहाण करत असल्याचं दिसत असल्याचे सांगण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकरणात संबंधितांनी चिकलठाणा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान हा प्रकार समोर कसा आला आणि याबाबत सर्वात आधी प्रशासनाकडे तक्रार करणारे प्रतिम घंगाळे यांनी विद्यालय प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच मुलांना होणाऱ्या मारहाणीसाठी जबाबदार देखील असल्याचा आरोप केला आहे.

हेही वाचा :

9 वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्याला डेट करतेय जरीन खान…
दुखणं ठीक करण्यासाठी डॉक्टर वृद्ध महिलेच्या पाठीवरच चढला, बेड तुटला सोबत हाडांचाही झाला खुळखुळा; Video Viral
ज्यो गीरा,वहि “सिकंदर”!