बॉलिवूड अभिनेत्री(actress) जरीन खान पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. पहिल्याच चित्रपट ‘वीर’ मधून आपल्या निरागस अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनात घर करणारी जरीन खान आता तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. सध्या तिचं नाव अभिनेता आणि मॉडेल रोहीद खानसोबत जोडले जात आहे. विशेष म्हणजे, रोहीद हा जरीनपेक्षा तब्बल नऊ वर्षांनी लहान आहे. अलीकडेच हे दोघे मुंबईतील एका रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना दिसले, त्यानंतर त्यांच्या नात्याच्या चर्चांना आणखी उधाण आले.

याआधीदेखील जरीन(actress) आणि रोहीद अनेक ठिकाणी एकत्र दिसले असून, त्यांच्या फोटों आणि व्हिडिओंनी सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले होते. यामुळे चाहत्यांमध्ये त्यांच्या नात्याबद्दल कुतूहल वाढले आहे. मात्र या चर्चांवर अखेर रोहीद खानने प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलताना त्याने स्पष्ट केले की, “आम्ही फक्त चांगले मित्र आहोत आणि त्या दिवशी फक्त जेवणासाठी भेटलो होतो.” त्याने प्रेमसंबंध असल्याच्या बातम्या फेटाळून लावल्या आहेत.

दरम्यान, जरीन खानने मात्र या प्रकरणावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. काही दिवसांपूर्वी त्यांनी एकत्र दिवाळी साजरी केली असल्याचे उघड झाल्याने या अफवांना अधिक वेग मिळाला होता. रोहीद खान हा 30 वर्षांचा ऑस्ट्रियन मॉडेल असून अलीकडेच तो ‘तेजस’ या चित्रपटात दिसला होता. तर 38 वर्षीय जरीन खानने ‘वीर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते आणि सध्या ती अभिनयासोबत स्वतःच्या व्यवसायातही सक्रिय आहे.
हेही वाचा :
ज्यो गीरा,वहि”सिकंदर”!
महिला टीमवर भाजप खासदाराकडून पैशांसह हिऱ्यांचा वर्षाव
वनतारामध्ये ‘महादेवी’ची वैद्यकीय तपासणी पूर्ण