बॉलिवूडमधील प्रसिद्ध आणि गुणी अभिनेते (actor)पंकज त्रिपाठी यांच्या घरातून एक अतिशय दु:खद बातमी समोर आली आहे. पंकज त्रिपाठी यांच्या प्रिय आई श्रीमती हेमवंती देवी यांचं निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या 89व्या वर्षी बिहारमधील गोपाळगंज जिल्ह्यातील बेलसंड गावातील वडिलोपार्जित घरात अखेरचा श्वास घेतला.अभिनेता पंकज त्रिपाठी यांनी सोशल मीडियावर एक निवेदन जारी करून ही दुःखद बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे —“आम्हाला कळवताना अत्यंत दुःख होत आहे की श्री पंकज त्रिपाठी यांच्या प्रिय आई श्रीमती हेमवंती देवी यांचे शुक्रवारी निधन झाले आहे. त्या काही काळापासून आजारी होत्या आणि त्यांनी घरीच शांततेत शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या शेवटच्या क्षणी पंकज त्रिपाठी त्यांच्या सोबत उपस्थित होते.”

शनिवारी बेलसंड येथे कुटुंबीय, नातेवाईक आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार पार पडले. कुटुंबीयांनी सर्व चाहत्यांना आणि माध्यमांना विनंती केली आहे की या दुःखाच्या काळात त्यांच्या गोपनीयतेचा आदर राखावा आणि त्यांना शांततेत शोक करण्यासाठी वेळ द्यावा.पंकज त्रिपाठी हे मूळचे बिहारमधील गोपाळगंज जिल्ह्यातील बेलसंड गावचे रहिवासी आहेत. सध्या ते मुंबईत आपल्या अभिनय कारकिर्दीमुळे स्थायिक झाले असले तरी त्यांच्या मनात गावाबद्दल नेहमीच आपुलकी आहे. त्यांच्या वडिलांचेही दोन वर्षांपूर्वी वयाच्या 98 व्या वर्षी निधन झाले होते. ते शेतकरी होते आणि साधं जीवन जगत गावातच राहायचे.
पंकज त्रिपाठी यांचे बालपण बेलसंड येथेच गेले. नंतर शिक्षणासाठी ते पाटणा येथे गेले आणि तिथे त्यांना नाट्यकलेची आवड निर्माण झाली. त्यानंतर त्यांनी अभिनयाला(actor) आपले ध्येय मानून त्यासाठी अथक परिश्रम केले.आज ते बॉलिवूडमधील सर्वाधिक आदरनीय आणि प्रगल्भ अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या वास्तववादी अभिनयामुळे त्यांनी चाहत्यांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गजांनी आणि चाहत्यांनी पंकज त्रिपाठी यांच्या आईच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. सर्वांनी श्रीमती हेमवंती देवी यांच्या आत्म्याला शांती लाभो, अशी प्रार्थना केली आहे

बॉलिवूड अभिनेता(actor) पंकज त्रिपाठी यांच्या आईचं निधन; 89व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, कुटुंब शोकाकुलबॉलिवूड अभिनेता पंकज त्रिपाठी यांच्या आई श्रीमती हेमवंती देवी यांचं निधन झालं आहे. त्या 89 वर्षांच्या होत्या. त्यांच्या गोपाळगंज येथील घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अंत्यसंस्कार बेलसंड येथे पार पडले.
हेही वाचा :
एक कॅचने टाकली भारताच्या झोळीत ट्राॅफी…
दहावी-बारावीच्या परीक्षांआधी बोर्डाचा मोठा निर्णय…
चहाप्रेमींनो सावधान! दिवसातून किती कप चहा पिणं तुमच्या आरोग्यासाठी ठीक?