कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी:

शस्त्र तस्करी प्रकरणात पंजाब पोलिसांनी महाराष्ट्र (Maharashtra)केसरी सिकंदर शेख याला अटक करण्यात आल्यानंतर कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील सर्वसामान्य कुस्ती शौकीन जितका हादरला तितके हादरे कुस्ती क्षेत्राला बसले नाहीत. कारण हे कधी ना कधी घडणारच होते अशा प्रतिक्रिया कुस्ती क्षेत्रातून व्यक्त झाल्या आणि अजूनही व्यक्त होत आहेत. एकाच वाक्यात सांगायचं तर “ज्यो गिरा, वही सिकंदर”! त्याच्यावर आता लव्ह जिहादचाही आरोप होऊ लागला आहे. त्याच्या सोलापूर येथील कुटुंबीयांना मात्र हा एका षडयंत्राचा भाग वाटतो आहे. कोल्हापुरातील काही नामवंत पैलवानानी मात्र चुकीला माफी नाही अशी तिखट प्रतिक्रिया देऊन त्याला शिक्षा झाली पाहिजे असे म्हटले आहे.

सिकंदर शेख हा मूळचा सोलापूरचा. त्याच्या वडिलांनी आर्थिक स्थिती जेमतेम असतानाही त्याला मोठा पैलवान करण्याचे स्वप्न पाहिले होते. मोठा कुस्तीगीर बनवण्यासाठी त्याला कोल्हापूरला पाठवले होते. विजयी गंगावेश तालीम येथे तो कुस्तीचे धडे घेत होता. गंगावेश परिसरातील या तालमीला मोठा जाज्वल्य इतिहास आहे. याच तालमीत हरिश्चंद्र बिराजदार हा पैलवान घडला. त्यांनी नवी दिल्लीच्या गुरु हनुमान आखाड्याच्या पैलवान सतपाल सिंगला चारीमुंड्या चीत केले होते. तेव्हा हरिश्चंद्र बिराजदार यांची कोल्हापूरच्या कुस्ती शौकिनांनी हत्तीवरून मिरवणूक काढली होती. याच तालीम संस्थेत हिंदकेसरी दीनानाथ सिंह हे घडले. पाडळकर वस्ताद यांची तालीम म्हणून विजयी गंगावेश तालमीची ओळख आहे.

याच तालमीच्या लाल मातीत सिकंदर शेख हा घडला. तो मूळचा सोलापूरचा असला तरी कोल्हापूरकरांनी त्याच्यावर निरातिशय प्रेम केले होते. तोच शस्त्र तस्करी गुन्ह्यात सापडल्यानंतर कोल्हापुरातील कुस्ती शौकिनांना धक्का बसला होता. आता या प्रकरणात ज्येष्ठ ज्येष्ठ पैलवान, हिंदकेसरी दीनानाथ सिंह यांनी अतिशय कडवट प्रतिक्रिया दिली आहे. सिकंदर शेख याच्या पापाचा घडा भरला आहे. त्याची नजर चांगली नव्हती. तो लव्ह जिहादी होता. त्याची प्रवृत्ती गुन्हेगारी स्वरूपाची होती. कुस्ती पंढरी असलेल्या या कोल्हापुरात पुन्हा सिकंदर शेख घडणार नाही याची दक्षता आम्ही घेऊच पण इथल्या कुस्ती शौकिनांनी सुद्धा घेतली पाहिजे. पैलवान होण्यासाठी आलेल्या तरुणांना लगाम घालणारे कोणी वस्ताद राहिलेले नाहीत. त्यामुळेच सिकंदर शेख सारखे पैलवान घडतात.

त्याच्या या गुन्ह्याला माफी नाही असे दीनानाथ सिंह यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हटले आहे. सिकंदर शेख याने स्वसंरक्षणासाठी एखादे अग्नि शस्त्र विकत घेतले असते तर आणि तेही सनदशीर मार्गाने खरेदी केले असते तर लोकांनी त्याला माफ केले असते. पण तो शस्त्र तस्करी प्रकरणात अडकला आहे. शस्त्र तस्करी करणाऱ्या टोळीचा तो सक्रिय सदस्य असल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. अशा प्रकारचे गुन्हे करण्यासाठी मोकळीक मिळावी म्हणून क्रीडापटू म्हणून लष्करात मिळालेली नोकरी त्यांनी सोडली आहे.त्याच्याबद्दल तो नुरा कुस्ती खेळतो असा आरोप केला जात होता. महाराष्ट्र केसरी ही किताबत त्याला अशाच प्रकारे मिळालेली आहे. असे आता दीनानाथ सिंह यांच्यासारखे ज्येष्ठ पैलवान जाहीरपणे सांगू लागले आहेत.

गुरु हनुमान आखाड्याचा सुप्रसिद्ध पैलवान सतपाल सिंग याला सिकंदर शेख हा नुरा कुस्ती खेळतो आहे असे आपणास वाटते का अशी विचारणा केली होती तेव्हा त्याने मी यावर काही बोलू शकत नाही अशी प्रतिक्रिया दिली होती. याचा अर्थ अप्रत्यक्षपणे सिकंदर शेख वर होत असलेल्या आरोपाला त्यांनी पुष्टी दिली (Maharashtra)होती असा होतो.सिकंदर शेख हा गरीब कुटुंबातून पुढे आलेला पैलवान आहे. म्हणून त्याच्याबद्दल कोल्हापुरात सहानुभूतीचे वातावरण होते. तो मूळचा सोलापूरचा असला तरी तो कोल्हापूरचाच आहे असे इथले कुस्ती शकील मानत होते. आता मात्र त्याच्याबद्दलचे असलेले प्रेम आणि सहानुभूती लाल मातीतच गाडली गेली आहे. ज्यो जीता वही सिकंदर! असे म्हटले जात असले तरी सिकंदरला मात्र”ज्यो गिरा, वही सिकंदर'”असे म्हटले जाईल. एकूणच त्याची कुस्ती क्षेत्रातील कारकीर्द संपुष्टात आलेली आहे.

हेही वाचा :

महिला टीमवर भाजप खासदाराकडून पैशांसह हिऱ्यांचा वर्षाव
वनतारामध्ये ‘महादेवी’ची वैद्यकीय तपासणी पूर्ण
पुढचे 24 तास धोक्याचे, राज्यात मुसळधार पावसाचा इशारा