भारतीय महिला क्रिकेट संघाने(team) रविवारी इतिहास रचला आहे. एकदिवसीय विश्वचषक 2025 च्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून पहिल्यांदाच वनडे वर्ल्ड कपचं जेतेपद पटकावलं. या शानदार विजयाने संपूर्ण देशात आनंदाचं वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे राज्यसभा खासदार आणि प्रसिद्ध हिरे व्यापारी गोविंद ढोलकिया यांनी महिला क्रिकेटपटूंना मौल्यवान बक्षिसांची मोठी घोषणा केली आहे.ढोलकिया यांनी सांगितलं की, “भारतीय महिला क्रिकेटपटूंनी देशाचं नाव उज्ज्वल केलं आहे. त्या सर्व खेळाडूंना मी नैसर्गिक हिऱ्यांचे दागिने भेट देणार आहे. त्यासोबतच प्रत्येक खेळाडूच्या घरी सौर छतावरील प्रणाली बसवण्याचीही माझी इच्छा आहे.” त्यांच्या या घोषणेचा व्हिडिओ आणि माहिती सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोविंद ढोलकिया यांनी बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांना पत्र पाठवून ही इच्छा व्यक्त केली आहे. त्या पत्रात त्यांनी लिहिलं आहे की, “महिला जेव्हा स्वतःवर विश्वास ठेवतात तेव्हा त्या काहीही साध्य करू शकतात. हा विजय फक्त खेळातील यश नाही, तर देशातील प्रत्येक मुलीसाठी प्रेरणादायी क्षण आहे.”सोशल मीडियावर त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे. ढोलकिया हे यापूर्वीही सामाजिक कार्यांसाठी ओळखले जातात. त्यांनी अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामासाठी 11 कोटी रुपये दान केले होते. तसेच त्यांच्या कंपनीतील कर्मचाऱ्यांना त्यांनी घरं आणि कार्स भेट दिल्या होत्या.

भारताने 2 नोव्हेंबरला नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर 53 धावांनी विजय मिळवला. भारताने दिलेल्या 299 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना (team)दक्षिण आफ्रिका 246 धावांवर गारद झाली. या विजयासह भारत वर्ल्ड कप जिंकणारा चौथा संघ ठरला.बॅटिंग आणि बॉलिंग या दोन्ही आघाड्यांवर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शेफाली वर्मा हिला सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून ‘वूमन ऑफ द मॅच’ पुरस्काराने गौरवण्यात आलं. संपूर्ण देशात सध्या या अभूतपूर्व यशाचा उत्सव साजरा होत आहे.

हेही वाचा :

अभिनेता पंकज त्रिपाठी यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर…
एक कॅचने टाकली भारताच्या झोळीत ट्राॅफी…
दहावी-बारावीच्या परीक्षांआधी बोर्डाचा मोठा निर्णय…