जयसिंगपूर : गुजरात येथील वनतारा केंद्रात ‘महादेवी’ हत्तीणीची (elephant)वैद्यकीय तपासणी रविवारी करण्यात आली असून, या तपासणीचा अहवाल संयुक्त पथकाने उच्चस्तरीय समितीकडे (एचपीसी) सादर केला आहे. आता या प्रकरणावरील पुढील निर्णय 29 नोव्हेंबरच्या सुनावणीत घेण्यात येणार आहे. या पाहणीदरम्यान नांदणी मठाचे माहुत आणि प्रतिनिधी महादेवीला पाहून भावूक झाले व त्यांच्या डोळ्यांत अश्रू अनावर झाले.रविवारी वनतारा येथे उच्चस्तरीय समिती, राज्य शासन, नांदणी मठ आणि वनतारा संस्थेच्या अधिकाऱ्यांची संयुक्त पाहणी झाली. या पाहणीत एचपीसीचे डॉ. एन. एस. मनोहरण, मठाचे डॉ. एस. कल्लाप्पा, पेटा संस्थेच्या डॉ. निनी अरवींदन, वनताराचे निरज संगवान, नांदणी मठाचे माहुत इस्माईल, डॉ. सागर पाटील आणि शिरीष हेरवाडे उपस्थित होते.

पाहणीदरम्यान मठाचे माहुत इस्माईल आणि पदाधिकारी महादेवी हत्तीणीला (elephant)पाहताच भावनाविवश झाले. माहुत इस्माईल यांनी महादेवीला मिठी मारली, तर हत्तीणीनेही सोंडाने त्यांच्या हातावर आणि चेहऱ्यावर फिरवून आपुलकी व्यक्त केली. हा भावनिक क्षण पाहून सर्व उपस्थितांच्या डोळ्यांत पाणी आले.याआधी, 22 ऑक्टोबर रोजी एचपीसीसमोर सुनावणी झाली होती. त्या वेळी महादेवी हत्तीणीची वैद्यकीय तपासणी करून अहवाल सादर करण्यासाठी 20 दिवसांची मुदत देण्यात आली होती. त्या अनुषंगाने संयुक्त पथकाने तपासणी पूर्ण करून अहवाल समितीकडे पाठवला आहे.

आता सर्वांच्या नजरा 29 नोव्हेंबरला होणाऱ्या सुनावणीकडे लागल्या आहेत, ज्यात महादेवी हत्तीणीच्या पुढील कार्यवाहीचा आणि स्थलांतराबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. या घटनेने नांदणी मठ आणि प्राणिप्रेमी वर्गात पुन्हा एकदा भावनिक वातावरण निर्माण झाले आहे.
हेही वाचा :
अभिनेता पंकज त्रिपाठी यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर…
एक कॅचने टाकली भारताच्या झोळीत ट्राॅफी…
दहावी-बारावीच्या परीक्षांआधी बोर्डाचा मोठा निर्णय…