बॉलिवूडची सर्वात सुंदर(beautiful) अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी ऐश्वर्या राय बच्चन नेहमीच तिच्या ग्लॅमरस जीवनशैलीसाठी आणि यशस्वी कारकिर्दीसाठी चर्चेत असते. नुकताच 1 नोव्हेंबर रोजी तिने आपला 52 वा वाढदिवस साजरा केला. मिस वर्ल्डचा किताब जिंकून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणाऱ्या ऐश्वर्याने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अभिनयातील तिची नजाकत, सौंदर्य आणि व्यक्तिमत्वामुळे ती चाहत्यांच्या मनावर राज्य करते. मात्र, तिचं वैयक्तिक आयुष्य मात्र नेहमीच चर्चेत राहिलं आहे. अभिषेक बच्चनसोबतच्या लग्नाआधी ऐश्वर्याचं नाव अनेक अभिनेत्यांसोबत जोडलं गेलं होतं, तर काही कलाकारांसोबत तिचं अद्याप मतभेदाचं नातं कायम आहे.

अभिनेत्री करीना कपूर खान आणि ऐश्वर्याचे(beautiful) संबंध फारसे चांगले नाहीत. एका पुरस्कार सोहळ्यात करीनाने ऐश्वर्याच्या हातातून मायक्रोफोन हिसकावून घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यानंतर दोघींमधील कोल्ड वॉर सुरू झालं आणि आजपर्यंत त्या एकत्र दिसलेल्या नाहीत.तसेच अभिनेता विवेक ओबेरॉय याच्यासोबत ऐश्वर्याचं नातं एकेकाळी चर्चेत होतं. सलमान खानसोबत ब्रेकअपनंतर ऐश्वर्याने विवेकला डेट केलं होतं, मात्र विवेकने सलमानबद्दल माध्यमांसमोर केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे हे नातं संपुष्टात आलं आणि दोघांनी पुन्हा कधीच एकमेकांशी बोलणं केलं नाही.
अभिनेत्री राणी मुखर्जी सोबतही ऐश्वर्याचं मैत्रीचं नातं तुटलं. “चलते चलते” चित्रपटातून ऐश्वर्याला काढून राणीला घेतल्यावर ऐश्वर्या दुखावली होती. त्या घटनेनंतर दोघींमधील संवाद पूर्णपणे थांबला.मॉडेलिंग विश्वातसुद्धा ऐश्वर्याचे मतभेद झाले होते. मिस इंडिया 1994 स्पर्धेत सुष्मिता सेन विजेती ठरल्यावर ऐश्वर्याने तिच्यासोबत बोलणं बंद केल्याचं म्हटलं जातं.

तर अभिनेत्री सोनम कपूरने एकदा ऐश्वर्याला “आंटी” म्हणत तिचा अपमान केला होता. त्या दोघी एकाच वेळी लॉरियल ब्रँडसाठी काम करत होत्या, आणि सोनमच्या वक्तव्यामुळे त्यांच्या नात्यात कायमचा दुरावा निर्माण झाला.एकूणच, ऐश्वर्या राय बच्चन ही जशी बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे, तशीच तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील मतभेद हे आजही चर्चेचा विषय ठरतात.
हेही वाचा :
अमानवी कृत्यामुळे महाराष्ट्र हादरला,गतिमंद मुलांना अमानुष मारहाण..
9 वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्याला डेट करतेय जरीन खान…
दुखणं ठीक करण्यासाठी डॉक्टर वृद्ध महिलेच्या पाठीवरच चढला, बेड तुटला सोबत हाडांचाही झाला खुळखुळा; Video Viral