रस्ते अपघात आणि मृत्यूचे वाढते प्रमाण लक्षात घेता, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने एक कठोर निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय महामार्गांच्या बांधकामातील त्रुटींमुळे अपघात झाल्यास, संबंधित कंत्राटदाराला (contractor)जबाबदार धरून त्याला दंड ठोठावण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग सचिव उमशंकर म्हणाले यांनी या निर्णयाची माहिती दिली. २०१८ मध्ये भारतीय राष्ट्रीय महामार्गांवर १,२५,८७३ अपघात झाले, ज्यात ४३,०९० मृत्यू झाले. देशातील एकूण अपघातांमध्ये राष्ट्रीय महामार्गांचा वाटा मोठा आहे. अपघातांचे मुख्य कारण वाहनचालकांचा निष्काळजीपणा, जसे की अतिवेग, हेल्मेट न वापरणे आणि नियमांचे उल्लंघन हे असले तरी, रस्त्यांच्या निकृष्ट कामांकडेही दुर्लक्ष करता येणार नाही.

मंत्रालयाच्या निर्देशानुसार, जर एखाद्या भागात एक किलोमीटरपेक्षा जास्त अंतरात एकाच ठिकाणी वारंवार अपघात होत असतील, तर रस्त्याच्या सुधारणेची जबाबदारी कंत्राटदारावर(contractor)असेल. जर कंत्राटदाराने ९०० मीटरच्या रस्त्याची वेळेत सुधारणा न केल्यास, त्याला २५ लाख रुपये दंड आकारला जाईल. हाच अपघात पुन्हा त्याच ठिकाणी घडल्यास, दंडाची रक्कम ५० लाखांपर्यंत वाढवण्यात येईल.

उमशंकर म्हणाले की, मंत्रालयाने ३,५०० अपघातप्रवण क्षेत्रे निश्चित केली आहेत. अपघातांची जबाबदारी निश्चित करण्यासाठी आणि रस्त्यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी ही पावले उचलण्यात आली आहेत. महाराष्ट्रातही २०१८ मध्ये महामार्गांवर ३९,०८४ अपघात झाले, ज्यात १४,३३५ लोकांचा मृत्यू झाला.संपूर्ण भारतात रस्ते अपघातांमध्ये मृत्यू पावणाऱ्यांची संख्या अंदाजे १.६० लाख असून, या गंभीर समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी हे कठोर निर्णय घेतले जात आहेत. गेल्या दशकात (२०१३-२०२३) अपघाती मृत्यूंमध्ये सुमारे ११ टक्क्यांची वाढ झाली आहे, जी चिंताजनक बाब आहे.

हेही वाचा :

अमानवी कृत्यामुळे महाराष्ट्र हादरला,गतिमंद मुलांना अमानुष मारहाण..
9 वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्याला डेट करतेय जरीन खान…
दुखणं ठीक करण्यासाठी डॉक्टर वृद्ध महिलेच्या पाठीवरच चढला, बेड तुटला सोबत हाडांचाही झाला खुळखुळा; Video Viral