महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या आगामी बोर्ड परीक्षांसाठी नवीन वेळापत्रक जाहीर केले आहे. यावर्षी परीक्षा पंधरा दिवस लवकर सुरू होत आहेत. यासोबतच, परीक्षा(Important) कॉपीमुक्त करण्यासाठी मंडळाने अत्यंत कठोर पावले उचलली असून, सर्व परीक्षा केंद्रांसाठी नवीन नियम लागू केले आहेत.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, इयत्ता बारावीची लेखी परीक्षा १० फेब्रुवारी २०२६ रोजी सुरू होईल.

ही परीक्षा १८ मार्च २०२६ पर्यंत चालणार आहे.त्याचप्रमाणे, इयत्ता दहावीची परीक्षा २० फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होईल आणि तिचा समारोपही १८ मार्च रोजी होईल. दोन्ही वर्गांच्या परीक्षा यावर्षी नियोजित वेळेपेक्षा पंधरा दिवस आधीच घेतल्या जात आहेत, ही महत्त्वाची बाब विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावी.

परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी मंडळाने अत्यंत कडक पाऊल उचलले आहे. ‘सरमिसळ पद्धत’(वेगवेगळ्या शाळांचे विद्यार्थी एकत्र बसवणे) यावर्षीही कायम ठेवली जाणार आहे(Important). यासोबतच, प्रत्येक परीक्षा केंद्रातील सर्व वर्गांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच, केंद्राला पक्की संरक्षक भिंत असणेही अनिवार्य आहे.

मागील वर्षी ज्या केंद्रांवर कॉपीचे प्रकार घडले होते, अशा केंद्रांची मान्यता यंदा रद्द केली जाणार आहे. १५ नोव्हेंबरपासून मंडळाकडून सर्व केंद्रांची पडताळणी सुरू होईल. सीसीटीव्ही , भिंत, स्वच्छतागृह या सुविधा नसलेल्या केंद्रांची मान्यता रद्द होईल. केंद्रांना सीसीटीव्ही बसवण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली जाईल आणि परीक्षेचे रेकॉर्डिंग ३० दिवसांसाठी जतन करणे बंधनकारक असेल.

हेही वाचा :

सारा तेंडुलकर स्क्रिनवर दिसली अन् शुभमन… काय घडलं? पाहा Video
ऐश्वर्या राय बच्चनचे या सेलिब्रिटींसोबत आहे 36 चा आकडा
‘…तर कंत्राटदाराला दंड ठोठावणार’; सरकारचा मोठा निर्णय