महिला एकदिवसीय विश्वचषक संपल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (आयसीसी) जाहीर केलेल्या नवीन क्रमवारीत मोठी उलथापालथ झाली आहे(World Cup). भारतीय संघाची स्टार सलामीवीर स्मृती मानधना हिला अव्वल स्थान गमवावं लागलं असून, दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्व्हार्ट हिने पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे. लॉराने उपांत्य आणि अंतिम सामन्यात सलग दोन शतके ठोकत उत्कृष्ट कामगिरी केली. तिच्या या दमदार फलंदाजीमुळे तिला ८१४ गुणांसह क्रमवारीत पहिलं स्थान मिळालं आहे. स्मृती मानधना आता ८११ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर घसरली असून दोघींमधील गुणांचा फरक अत्यंत कमी आहे.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाची अष्टपैलू खेळाडू ॲश्ले गार्डनरला एका स्थानाचा तोटा झाला आहे आणि ती आता ७३८ रेटिंगसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारतीय संघासाठी(World Cup) आणखी एक आनंदाची बाब म्हणजे, मधल्या फळीतून शानदार खेळी करणाऱ्या जेमिमा रॉड्रिग्सने टॉप १० मध्ये दमदार प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध झळकावलेल्या शतकाच्या जोरावर जेमिमाने तब्बल नऊ स्थानांची झेप घेत १०व्या क्रमांकावर मजल मारली आहे.

कर्णधार हरमनप्रीत कौरलाही चार स्थानांचा फायदा झाला असून ती आता ६३४ रेटिंगसह १४व्या क्रमांकावर पोहोचली आहे. या क्रमवारीत भारतीय खेळाडूंच्या सातत्यपूर्ण कामगिरीचं प्रतिबिंब दिसून येत असून, आगामी मालिकांमध्ये स्मृती मानधनासाठी पुन्हा अव्वल स्थान मिळवण्याची मोठी संधी आहे.

हेही वाचा :

भारताच्या चॅम्पियन खेळाडूंनी घेतला प्रेमानंद महाराज यांचे दर्शन, सोशल मिडियावर Video Viral
१० रुपयांच्या तुरटीचा ‘या’ पद्धतीने करा वापर, त्वचा होईल मुलायम
सोने, चांदी खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या आजचे दर!