गुंतवणूकदारांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे, कारण मंगळवारी सकाळी सोने (gold)आणि चांदीच्या किंमतींमध्ये घसरण दिसून आली. डॉलर मजबूत झाल्याने आणि गुंतवणूकदारांकडून झालेल्या नफेखोरीमुळे दोन्ही मौल्यवान धातूंच्या भावावर परिणाम झाला आहे. त्यामुळे सोनं आणि चांदी दोन्ही स्वस्त झाले आहेत.आज सकाळी 10:20 वाजता वायदे बाजारात डिसेंबर महिन्यातील वायद्यासाठी सोन्याच्या भावात 0.68% घसरण झाली. सोनं आता ₹1,20,583 प्रति 10 ग्रॅम या दराने व्यापार करत आहे. तर चांदीच्या भावातही 0.66% घसरण झाली असून ती ₹1,46,783 प्रति किलोग्रॅम या दराने व्यवहारात आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोन्यात सातत्याने वाढ होत होती, पण गुंतवणूकदारांनी उच्च भावावर विक्री केल्याने सोन्याचा भाव खाली आला आहे. म्हणजेच ज्यांनी आधी कमी दरात सोने(gold) घेतले होते, त्यांनी आता उच्च दरावर विक्री करत नफा मिळवला, परिणामी बाजारात सोन्याचा पुरवठा वाढला आणि किंमती खाली आल्या. सोन्याच्या जागतिक किंमती नेहमी अमेरिकन डॉलरमध्ये निश्चित होतात. डॉलर मजबूत झाल्यास इतर देशांच्या चलनात सोने खरेदी करणे महाग पडते, त्यामुळे मागणी घटते आणि भाव घसरतात. सध्या डॉलर इंडेक्स 0.20% वाढून 100.05 वर पोहोचला आहे — ही गेल्या तीन महिन्यांतील उच्चांकी पातळी आहे.
अमेरिकन फेडरल रिझर्व्हने व्याजदर कपात थांबवण्याचे संकेत दिल्याने डॉलरची ताकद वाढली आहे. याच कारणामुळे सोने आणि चांदीच्या किंमतींवर दबाव निर्माण झाला आहे. जर पुढील काही आठवड्यांत पुन्हा व्याजदर कपात झाली, तर सोने आणि चांदीचे भाव आणखी कमी होऊ शकतात, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.गेल्या 15 दिवसांपासून चांदीच्या बाजारात घसरण सुरू होती. सोमवारनंतर मंगळवारी पुन्हा किंमती खाली आल्या. आज MCX वर चांदी ₹1,46,783 प्रति किलो या दराने व्यापार करत आहे.

चांदीचा वापर केवळ दागदागिने बनविण्यासाठीच नव्हे, तर औद्योगिक क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात केला जातो. मोबाईल, संगणक, सौर ऊर्जा पॅनेल, इलेक्ट्रॉनिक उपकरणं आणि वाहन उद्योगात चांदी महत्त्वाची भूमिका बजावते. एका अंदाजानुसार, ६० ते ७० टक्के चांदीचा वापर औद्योगिक उद्देशांसाठीच होतो.सध्या दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव ₹1,22,510 प्रति 10 ग्रॅम, मुंबईत आणि पुण्यात ₹1,22,460 रुपये, कोलकाता आणि बंगळुरूतही ₹1,22,460 रुपये, तर बडोदा आणि अहमदाबादमध्ये ₹1,22,510 रुपये इतका आहे. स्थानिक कर आणि राज्यस्तरीय करानुसार शहरानुसार किंमतीत थोडाफार फरक दिसतो.
हेही वाचा :
चॅटजीपीटी वापरकर्त्यांसाठी मोठी खुशखबर!
जुळ्या मुलांचा रंग पाहून गोऱ्यागोमट्या नवऱ्याने रुग्णालयात घातला राडा, बायको हादरली; Video Viral
एक्स्ट्रा क्लासच्या नावाखाली दोन मुलींना बोलावलं आणि…शिक्षकानेच….