पिंपरी-चिंचवड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शिक्षकानेच(teacher) अलपवयीन विद्यार्थिनीचा विनभंग केल्याचे समोर आले आहे. पूर्व परीक्षांच्या तयारीसाठी घेतल्या जाणाऱ्या क्लासेसमध्ये हा प्रकार घडला आहे. एक्स्ट्रा क्लासेसच्या नावाखाली बोलावलं आणि मग मुलींचा विनयभंग करण्यात आला आल्याची माहिती समोर आली आहे. ही माहिती समोर येताच शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चेतन चव्हाण असं गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींचा नाव आहे.

आरोपी शिक्षकाने १७ वर्षीय अल्पवयीन पीडित मुलगी आणि तिच्या मैत्रिणीला एक्स्ट्रा क्लासेसच्या नावाखाली बोलावलं त्यानंतर आरोपीने शनिवारी दुपारी दीड वाजता पीडित मुलीला बोलावलं आणि तिच्या मैत्रिणीला रसायनशास्त्राचा पेपर सोडविण्यासाठी देऊन चौथ्या मजल्यावर पाठवलं. त्यात ती काय करते हे पाहणायसाठी आरोपी अल्पवयीन मुलीला लिफ्टमध्ये घेऊन गेला आणि तिचा विनयभंग केला. त्यानंतर मुलगी आपल्या मैत्रिणीसोबत बसली. तेव्हा शिक्षक ऑफीस बंद करण्यासाठी खाली चल म्हणून तिच्या मागे लागला. तिने विरोध केला असता डोळे मोठे करून तिला दम देत पुन्हा लिफ्ट मधून खाली येत असताना पुन्हा तिचा विनयभंग केला.
एवढेच नाही तर आरोपी शिक्षकाने तुला सोडवण्यासाठी घरी येतो असे म्हंटले. तेव्हा मुलीने मावशीकडे जायचे आहे असे सांगितले आणि सुटका करून घेतली. नराधम शिक्षकाच्या(teacher) तावडीतून स्वतःची सुटका केल्यानंतर पीडित मुलीने वडिलांना घडलेला सर्व प्रकार सांगितलं. त्यांनतर पीडित मुलीच्या वडिलांनी निगडी पोलीस ठाणे गाठत याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
पुणे ग्रामीण पोलीस दलाने दौंड तालुक्यातील कुरकुंभ गावात अवैध धंद्यांविरोधात मोठी कारवाई केली आहे. एक चिकन सेंटरच्या नावाखाली अवैधरित्या गांजाची विक्री सुरु होती. याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला. त्यानंतर एका आरोपीला अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव सलीम आदम शेख असे आहे.

पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई केली असून पोलिसांना तब्बल 1 किलो 383 ग्रॅम वजनाचा विक्रीस बंदी असलेला गांजा आढळून आला आहे. बाजारभावानुसार जप्त करण्यात आलेल्या या गांजाची अंदाजित किंमत २० हजार 745 रुपये इतकी आहे. पोलिसांनी हा संपूर्ण गांजाचा साठा जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिसरात अवैध धंदे चालवत मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांना संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरु केली आहे.
हेही वाचा :
महाराष्ट्रात मिळणार मोफत वीज, ‘रूफ टॉप’ योजना जाहीर
राजकीय डावपेच; ठाकरे गटाच्या नेत्याने केले ‘हे’ आवाहन
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; जगभरात खळबळ