रत्नागिरी नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार राजकीय तयारी आणि डावपेच सुरू झाले आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केलेली असताना उबाठा रत्नागिरी तर्फे उबाठाचे उपनेते माजी (Political)आमदार बाळ माने यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी अंतर्गत परिवर्तनाची पदयात्रा सुरू करण्यात आली.

सकाळी आठ वाजल्यापासून ते अकरा वाजेपर्यंत आणि दुपारी चार ते रात्री आठ वाजेपर्यंत ही पदयात्रा सुरू होती. नऊ दिवस ही पदयात्रा सुरू राहणार आहे आणि या पदयात्रेदरम्यान उबाठातर्फे(Political) जनतेशी संवाद साधला जाणार आहे. तसेच नगर परिषदेत सत्ता परिवर्तनासाठी जनतेचे सहकार्य, आशीवांद मागितले जात आहेत, अशी माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते, माजी आमदार बाळ माने यांनी आज येथे पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

यावेळी माजी आमदार बाळा माने म्हणाले, सनागिरी शहरातील शंभर किलोमीटर अंतराचे जे रस्ते आहेत त्या रख्यांवरून ही उबाठाची पदयात्रा पुढील नऊ दिवस सुरू राहणार आहे. सर्व नागरिकांशी संपर्क, संवाद साधला जाणार आहे. तसेच या पदयात्रेत रत्नागिरीतील नागरिकांनीही सहभागी व्हावे असे आवाहन बाळ माने यांनी केले. रत्नागिरीतील रस्ते, वीज, पाणी, ड्रेनेज यासारख्या महत्वाच्या विषयांवर रत्नागिरी करांची मते, या पदयात्रेत जाणून घेतली जाणार आहेत.

रत्नागिरी करांच्या समस्या सोडविण्यासाठी उबावाच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी काली सक्षम आहे याबाबत जागृती करून रत्नागिरी नगर परिषदेत जनतेने महाविकास आघाडीच्या माध्यमातून सत्ता परिवर्तन करावे, असे आवाहनही नागरिकांना केले जात आहे, असे माने म्हणाले.

हेही वाचा :

डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; जगभरात खळबळ
पत्नीला संपवलं, मुलाला मृतदेहाशेजारी…; भाजप नेत्याच्या क्रूर कृत्याने पोलीसही हादरले
खराब वातावरणात आवर्जून प्या काढा, सर्दी-खोकला होईल छुमंतर