बॉलिवूडमधील सदाबहार आणि ग्लॅमरस अभिनेत्री मलायका अरोरा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. वयाच्या पन्नाशीपुढे गेल्यानंतरही ती फिटनेस आणि स्टाईलच्या बाबतीत अनेक तरुण अभिनेत्रींचा(actress) आदर्श मानली जाते. अर्जुन कपूरसोबतचे तिचे नाते आणि त्यानंतर झालेला ब्रेकअप हे बॉलिवूडमधील चर्चेचे विषय ठरले होते. मात्र, आता मलायकाच्या आयुष्यात पुन्हा प्रेम फुलल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

अलीकडेच मलायकाने मुंबईत झालेल्या प्रसिद्ध गायक एनरिक इग्लेसियसच्या कॉन्सर्टला हजेरी लावली होती. या कॉन्सर्टमध्ये ती पांढऱ्या टँक टॉप आणि निळ्या शॉर्ट्समध्ये झळकली होती. तिच्या या हॉट आणि ग्लॅमरस लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले. पण तिच्या लूकपेक्षा जास्त चर्चा झाली ती तिच्यासोबत दिसणाऱ्या एका मिस्ट्री मॅनची.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये मलायका(actress) एका हँडसम तरुणासोबत बोलताना आणि नंतर त्याच्यासोबत इव्हेंटमधून बाहेर पडताना दिसली. या तरुणाची ओळख 33 वर्षीय हिरा व्यापारी हर्ष मेहता अशी समोर आली आहे. यानंतर चाहत्यांमध्ये कुजबुज सुरू झाली की, अर्जुन कपूरनंतर मलायका आता हर्ष मेहताला डेट करत आहे का?

मलायकाने या चर्चांवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही, मात्र तिचा हा नवा लूक आणि रहस्यमय साथिदार पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. काही चाहत्यांनी तर हर्ष मेहताला अर्जुन कपूरपेक्षाही अधिक हँडसम म्हटले आहे. मलायका आणि हर्ष यांच्यातील नात्याविषयी अद्याप काहीही अधिकृत माहिती नसली तरी बॉलिवूड वर्तुळात या नव्या जोडगोळीच्या चर्चांना उधाण आले आहे.
हेही वाचा :
न्यूड फोटोंपासून 26 वर्ष लहान मुलीसोबत लग्न… अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला अभिनेता
केवळ 500 रुपयांत मिळतोय Apple AirTag सारखा ट्रॅकर
विश्वविजेत्या 3 महिला खेळाडूंचा राज्य सरकार करणार सत्कार…