हरवलेल्या वस्तू शोधण्यासाठी Apple AirTag आज जगभरात लोकप्रिय ठरला आहे. या छोट्या पण अत्याधुनिक उपकरणाच्या मदतीने तुम्ही मोबाईल अॅपच्या माध्यमातून कोणत्याही वस्तूचे अचूक लोकेशन शोधू शकता. बॅग, वॉलेट, कारच्या किल्ल्या, घराची चावी किंवा पाळीव प्राणी अशा अनेक वस्तूंवर(popular) हा टॅग लावता येतो. मात्र, Apple AirTag ची किंमत ₹3,499 इतकी असल्यामुळे अनेक ग्राहक स्वस्त पर्याय शोधत आहेत.

अशा ग्राहकांसाठी बाजारात काही परवडणारे लोकेशन ट्रॅकर्स उपलब्ध आहेत, ज्यांची किंमत फक्त ₹499 पासून सुरू होते. Portronics या भारतीय ब्रँडचा ब्लूटूथ-आधारित लोकेशन फाईंडर सध्या सर्वाधिक लोकप्रिय ठरत आहे. फक्त ₹499 किंमतीत उपलब्ध असलेला हा ट्रॅकर तुम्ही चावी, वॉलेट, बॅग किंवा पाळीव प्राणी अशा कोणत्याही वस्तूवर लावू शकता. वस्तू हरवल्यास मोबाईल अॅपवरून तिचे लोकेशन सहज शोधता येते.
Portronics ट्रॅकरमध्ये एक लहान सेल बसवलेला असतो, जो जवळपास वर्षभर टिकतो आणि सहज बदलता येतो. हा ट्रॅकर iOS उपकरणांशी सुसंगत आहे, त्यामुळे iPhone वापरकर्त्यांसाठी तो उपयुक्त ठरतो, मात्र तो Android डिव्हाइसवर कार्यरत नाही.

एका पेक्षा अधिक वस्तूंसाठी हे लोकेशन फाईंडर वापरता (popular)येतात. त्यामुळे एकाच वेळी अनेक वस्तूंचे लोकेशन ट्रॅक करणे सोपे होते. Portronics व्यतिरिक्त JioTag, boAt, Noise आणि Motorola सारख्या ब्रँड्सचे देखील स्मार्ट लोकेशन ट्रॅकर्स बाजारात उपलब्ध आहेत. यापैकी JioTag ची किंमत ₹999 आहे.स्वस्त आणि उपयोगी अशा या ट्रॅकर्समुळे आता वस्तू हरवण्याची भीती कायमची दूर होऊ शकते, कारण काही सेकंदांतच मोबाईलवर त्या वस्तूचे ठिकाण पाहता येते.
हेही वाचा :
विश्वविजेत्या 3 महिला खेळाडूंचा राज्य सरकार करणार सत्कार…
विश्वविजेत्या स्मृती मानधनाला मोठा धक्का…
भारताच्या चॅम्पियन खेळाडूंनी घेतला प्रेमानंद महाराज यांचे दर्शन, सोशल मिडियावर Video Viral