बॉलिवूडमधील मेगास्टार अमिताभ बच्चन हे कायम कुठल्या ना कुठल्या कारणामुळे चर्चेत असतात. नुकताच त्यांनी 83 वा वाढदिवस साजरा केला आहे. त्यावेळी त्यांनी स्वत:लाच गिफ्ट म्हणून महाराष्ट्रातील अलिबाग इथे तीन भूखंड खरेदी केली आहेत. ज्यांची किंमत 6.6 कोटींच्या घरात आहे. पण नुकतीच समोर आलेल्या बातमीनुसार बिग बी यांनी मुंबईतील प्रीमियम लोकेशन असलेल्या गोरेगावमधील आलिशान असे 2 फ्लॅट्स(flats) विकले आहेत. त्यांनी हे फ्लॅट्स 2012 मध्ये 8.12 कोटींना खरेदी केले होते. दोन्ही फ्लॅट गोरेगाव पूर्वेतील ओबेरॉय एक्झिझिट इमारतीच्या 47 व्या मजल्यावर होते.

तर आम्ही तुम्हाला सांगतो, अमिताभ बच्चन यांनी मालमत्ता विकण्याची ही पहिलीच वेळ नाही. बिग बी गेल्या अनेक वर्षांपासून मालमत्ता खरेदी आणि त्यानंतर विक्री करून नफा कमवत आहेत. त्यांनी जानेवारी 2025 मध्येही अंधेरीतील द अटलांटिस इमारतीतील 5,185 चौरस फूट कार्पेट एरिया असलेले त्यांचे डुप्लेक्स अपार्टमेंट 83 कोटी रुपयांना विकला होता. अमिताभ आणि अभिषेक हे गेल्या काही वर्षांपासून रिअल इस्टेट मार्केटमध्ये खूप सक्रिय आहेत.

आता अमिताभ यांनी गोरेगावातील फ्लॅट्स विकून तब्बल 47 टक्के नफा कमावला आहे. पहिला फ्लॅट आशा ईश्वर शुक्ला यांनी 6 कोटीमध्ये खरेदी केला होता. ज्यावर ₹30 लाख स्टॅम्प ड्युटी आणि ₹30,000 नोंदणी शुल्क होतं. हा करार 31 ऑक्टोबर 2025 रोजी नोंदणीकृत झाला. दुसरा फ्लॅट(flats) देखील ममता सुरजदेव शुक्ला यांनी 6 कोटी मध्ये खरेदी केला होता. हा करार 1 नोव्हेंबर 2025 रोजी नोंदणीकृत झाला. दोन्ही फ्लॅटसह चार कार पार्किंग जागा देखील विकण्यात आल्या.

तर अमिताभ बच्चन आणि अभिषेक यांनी मुलुंड पश्चिमेतील ओबेरॉय रिअल्टीच्या एटर्निया प्रकल्पात 10 फ्लॅट खरेदी केलं, ज्यांची एकूण किंमत 24.94 कोटी रुपये होती. आजकाल रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करणे हे सामान्य झाले असून विशेषतः बॉलिवूड स्टार्ससाठी… ते प्रॉपर्टी गुंतवणुकीतून भरीव नफा कमवत आहेत. जेव्हा अमिताभ बच्चनसारखे मोठे स्टार मालमत्ता खरेदी करतात किंवा विकतात तेव्हा ते अनेकदा बातम्यांसारखे असते. अशा डीलमुळे अनेकदा मोठी चर्चा निर्माण होते.

हेही वाचा :

‘महिला विश्वचषक विजय हा 1983 सारखा नाही…
घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल हनी चिली पोटॅटो, कुरकुरीत बनवण्यासाठी काही खास टिप्स
शेंगदाणे खाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे…