हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला संघाने आयसीसी विश्वचषक 2025 जिंकून इतिहास रचला आहे. नवी मुंबईत झालेल्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण ऑफ्रिकेचा 52 धावांनी पराभव करत 52 वर्षांनंतर विजेतेपदाचा (World Cup)वनवास संपवला. या विजयानंतर भारतीय महिला क्रिकेट संघावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. भारतीय क्रिकेट संघाचे दिग्गज फलंदाज सुनील गावसकर यांनी भारताच्या महिला विश्वचषक विजयाचे कौतुक केलं. पण दुसरीकडे त्याची तुलाना 1983 च्या पुरुषांच्या विजयाशी होऊ शकत नाही.

द स्पोर्टस्टारमध्ये लिहिताना सुनील गावसकर असे म्हणालेत की, या विजयाने पुन्हा एकदा अधोरेखित केलंय की, जर कधी गरज पडली तर, क्रीडा बुद्धिमत्तेमुळे ट्रॉफी जिंकता येतात, विद्यापीठांकडून(World Cup) फॅन्सी पदव्या नव्हे. हे देखील सिद्ध करते की भारतीय प्रशिक्षकांना नेहमीच सर्वोत्तम निकाल मिळतात कारण ते खेळाडूंना – त्यांची ताकद, कमकुवतपणा आणि स्वभाव – ओळखतात आणि कोणत्याही परदेशी खेळाडूपेक्षा भारतीय क्रिकेटच्या बारकावे चांगल्या प्रकारे समजतात, मग तो कितीही यशस्वी असो.
महिला संघाच्या 2025 च्या विश्वचषक विजय आणि 1983 मधील पुरुष संघाच्या पहिल्या विजयाची तुलना केली जात आहे. याबद्दल बोलताना गावस्कर म्हणाले की, दोन्ही विजय ऐतिहासिक असले तरी परिस्थिती खूप वेगळी होती. कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ 2025 पूर्वीच दोन विश्वचषक अंतिम फेरीत पोहोचला असताना, कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ त्यांचा पहिलाच बाद फेरीचा सामना कसा खेळत होता यावर गावसकर यांनी त्यांच्या लेखातून प्रकाश टाकलाय.

ते पुढे म्हणतात, “काही जणांनी या विजयाची तुलना 1983 मध्ये पुरुष संघाने जिंकलेल्या विश्वचषकाशी करण्याचा प्रयत्न केला. तसं पाहता पुरुष संघ कधीही गट टप्प्याच्या पलीकडे प्रगती करू शकला नव्हता, आणि त्यामुळे बाद फेरीपासून ते पुढे सर्वकाही त्यांच्यासाठी नवीन होतं, तर महिला संघाचा रेकॉर्ड आधीच चांगला होता, कारण या शानदार विजयापूर्वी ते दोन अंतिम फेरीत होते.”महिला क्रिकेट संघ जेव्हा अंतिम फेरीत पोहोचला, तेव्हा सुनील गावसकर यांनी एक इच्छा व्यक्त केली होती. ते म्हणाले होती की, ‘जर भारताने वर्ल्डकप जिंकला तर ती आणि मी, जर तिची हरकत नसेल तर आम्ही एकत्र गाणं गाऊ. तिच्याकडे तिचं गिटार असेल आणि मी गाणं गाईन.’ आता त्यांची ही इच्छा पूर्ण होते का ते पाहावे लागेल.
हेही वाचा :
घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल हनी चिली पोटॅटो, कुरकुरीत बनवण्यासाठी काही खास टिप्स
शेंगदाणे खाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे…
प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी