रोजच्या डाळ-भात-भाजी-चपातीच्या जेवणाला कंटाळा आला असेल, तर घरच्या घरी काहीतरी चटपटीत आणि हटके बनवायला काय हरकत आहे! बटाटा हा सर्वांच्या आवडीचा पदार्थ असल्याने तुम्ही सहज रेस्टॉरंट स्टाईल हनी चिली पोटॅटो तयार करू शकता(potatoes). हा स्वादिष्ट चायनीज स्टार्टर बनवायला सोपा असून, चवीला गोडसर, झणझणीत आणि कुरकुरीत असतो.

हनी चिली पोटॅटो बनवण्यासाठी तुम्हाला बटाटे, कॉर्नफ्लोअर, तेल, तीळ, सोया सॉस, कुस्करलेल्या लाल मिरच्या, चवीनुसार मीठ, धणे, शिमला मिरची, हिरव्या मिरच्या, आले, टोमॅटो सॉस, लाल मिरची सॉस आणि मध यांची आवश्यकता असते. प्रथम बटाटे सोलून लांब काप करा आणि कॉर्नफ्लोअरमध्ये चांगले मिसळा. नंतर गरम तेलात हे बटाटे सोनेरी तपकिरी होईपर्यंत तळा.
एका पॅनमध्ये थोडे तेल गरम करून त्यात तीळ, हिरव्या मिरच्या, आले आणि सॉस घाला. नंतर सोया सॉस, टोमॅटो सॉस, लाल मिरची सॉस, थोडी मिरची पावडर, मीठ आणि व्हिनेगर (potatoes)टाका आणि मिश्रण मंद आचेवर शिजवा. शेवटी गॅस बंद करून त्यात मध घाला आणि तळलेले बटाटे या सॉसमध्ये चांगले परता. काही क्षणांतच तुमचे हनी चिली पोटॅटो तयार होतील — कुरकुरीत, सुगंधी आणि चवीने भरलेले. हा पदार्थ पार्टी, संध्याकाळचा नाश्ता किंवा पाहुण्यांसाठी स्टार्टर म्हणून उत्तम पर्याय ठरू शकतो.

हेही वाचा :
शेंगदाणे खाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे…
प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
हॅलो! तुझी नवरी रात्रीच..’ नवरदेव वरात घेऊन निघणारच होता, तितक्यात