महागडे ड्रायफ्रुट्स जसे काजू, बदाम किंवा पिस्ता खाण्याऐवजी साधे शेंगदाणे खाल्ले तरी तितकेच पोषक घटक मिळतात. अनेकांना हे माहीत नसतं की शेंगदाण्यात (peanuts)अंड्यांपेक्षाही जास्त प्रमाणात प्रोटीन असतं. यात प्रोटीन, फायबर, हेल्दी फॅट्स, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे हे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात.शेंगदाणे केवळ चविष्ट नाहीत, तर ते शरीराची ऊर्जा वाढवण्यासोबतच हृदय, मेंदू, त्वचा आणि केस निरोगी ठेवण्यास मदत करतात. शाकाहारी लोकांसाठी शेंगदाणा हा उत्तम प्रोटीनचा स्रोत आहे, जो मसल्स वाढवण्यासाठीही उपयोगी ठरतो. दररोज 25–30 ग्रॅम शेंगदाणे आहारात समाविष्ट केल्यास शरीराला आवश्यक पोषण मिळतं आणि एकूण आरोग्य सुधारतं.

शेंगदाण्यांमुळे (peanuts)मेटाबॉलिझम सक्रिय राहतो, ज्यामुळे शरीरातील चरबी कमी होण्यास आणि वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते. हे भूक कमी लावतात, त्यामुळे दीर्घकाळ पोट भरल्यासारखं वाटतं. त्यातील व्हिटॅमिन B3 आणि नियासिन मेंदूला बळकटी देतात, लक्ष केंद्रित ठेवतात आणि तणाव कमी करतात.शेंगदाण्यातील व्हिटॅमिन E त्वचेला नैसर्गिक चमक देतं आणि ती मऊ व टवटवीत ठेवतं. तसेच हे केसांना पोषण देऊन त्यांना मजबूत आणि चमकदार बनवतात. शेंगदाण्याचं तेल नैसर्गिक मॉइश्चरायझर म्हणून वापरता येतं, जे त्वचा कोरडी होण्यापासून वाचवतं.

मधुमेह असलेल्या लोकांसाठीही शेंगदाणे एक उत्तम आणि सुरक्षित नाश्त्याचा पर्याय आहे, कारण ते रक्तातील साखर स्थिर ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे शेंगदाणे हे स्वस्त, स्वादिष्ट आणि पौष्टिक सुपरफूड असल्याचं म्हणता येईल.

हेही वाचा :

प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
हॅलो! तुझी नवरी रात्रीच..’ नवरदेव वरात घेऊन निघणारच होता, तितक्यात 
52 वर्षीय मलायका 33 वर्षीय तरुणाच्या प्रेमात