प्रायव्हेट डिटेक्टिव तान्या पुरी(actress) यांनी बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीबद्दल मोठा गौप्यस्फोट केला आहे. ही अभिनेत्री सध्या चित्रपटात सक्रिय नसली तरी तिचे आयुष्य आलिशान आहे. हे आलिशान आयुष्य जगण्यासाठी ती पडद्यामागे ‘एस्कॉर्ट’ म्हणून काम करते आणि ‘वन नाईट स्टँड’ करते, असा धक्कादायक दावा त्यांनी केला आहे.प्रायव्हेट डिटेक्टिव तान्या पुरी यांनी एका मुलाखतीत अभिनेत्रीचे नाव न घेता ही धक्कादायक माहिती दिली. त्यांनी सांगितले की, ही अभिनेत्री गेल्या काही वर्षांपासून चित्रपटांमध्ये फारशी सक्रिय दिसत नाही, मात्र तिची जीवनशैली अत्यंत आलिशान आणि ‘रॉयल’ आहे.

हा आलिशान खर्च भागवण्यासाठी ती लोकांना हॉटेल्समध्ये भेटते आणि विविध कार्यक्रमांसाठी पैसे घेते. मात्र, पडद्यामागील सत्य वेगळेच आहे. तान्या यांच्या दाव्यानुसार, ही अभिनेत्री ‘स्पेशल अपीयरन्स’च्या नावाखाली वेगवेगळ्या देशांमध्ये जाते, लोकांना भेटते आणि त्यांच्याकडून मोठ्या रकमा घेते.खुद्द अभिनेत्रीच्या(actress) जोडीदारानेच तान्या पुरी यांना फसवणुकीच्या संशयावरून पाळत ठेवण्यासाठी हायर केले होते. तपासात उघड झाले की, ती केवळ एकाच व्यक्तीसोबत नसून अनेकांसोबत संबंध ठेवते आणि शारीरिक सुखाच्या बदल्यात पैसे घेते. धक्कादायक म्हणजे, जोडीदाराला हे सत्य आधीच माहित होते; त्याने केवळ ‘मनाच्या समाधानासाठी’ ही माहिती जाणून घेतली.

तान्या यांनी सांगितले की, ही अभिनेत्री विवाहित नसून महिन्याला १० लोकांपर्यंत ‘वन नाईट स्टँड’ करते. तिचे दर रात्रीसाठी १० लाख, २० लाख ते ५० लाखांपर्यंत आहेत. पॅकेज कोणते निवडले जाते यावर किंमत ठरते. तान्या यांच्या मते, ९०% लोक अशा प्रकरणात नाते तोडत नाहीत, कारण त्या पैशाचा त्यांनाही फायदा होतो.

हेही वाचा :

‘क्रिकेटचा राजा’ आणि ‘चेस मास्टर’ विराट कोहली झाला ३७ वर्षांचा
विमानाचा भीषण अपघात ; उड्डाण घेताच विमान कोसळले अन्…, VIDEO व्हायरल
दाम्पत्याच्या दुचाकीला ट्रकची जोरदार धडक; पत्नीसमोरच पतीला ट्रकने चिरडले