भरधाव ट्रकने दुचाकीस्वार दाम्पत्याला जबर धडक दिली. दोघेही वाहनासह खाली पडले. त्याच दरम्यान ट्रकचे (truck)चाक अंगावरून गेल्याने पतीचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची ही भीषण घटना वाठोडा पोलिस ठाण्यांतर्गत आऊटर रिंगरोडवर घडली. गंभीर जखमी पत्नीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

दशरथ सखाराम झाडे (वय ३०, रा. शेतापूर, कुही) असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी त्यांचीस पत्नी कविता झाडे (वय २५) यांच्या तक्रारीवरून आरोपी ट्रक(truck) चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. माहितीनुसार, सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास दशरथ हे पत्नी कवितासोबत दुचाकीने (एमएच-३५/ई-८१७७) काही कामानिमित्त नागपूरला येत होते. जबलपूर बायपास आऊटर रिंगरोडवर एफएलडी ढाब्याजवळ ट्रक चालकाने दशरथच्या दुचाकीला जबर धडक दिली. पती-पत्नी वाहनासह खाली पडले. त्याच दरम्यान ट्रकचे चाक अंगावरून गेल्याने दशरथ यांचा जागीच मृत्यू झाला.
दुसऱ्या बाजूला पडल्याने कविता थोडक्यात बचावल्या. मात्र, त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. डोळ्यासमोर पतीचा चेंदामेंदा होताना पाहून कविताला मोठा मानसिक धक्का बसला.दुसऱ्या एका घटनेत, आमोदा मोर नदी पुलाजवळ केळी मजूर घेऊन जाणारा आयशर ट्रक पलटी झाला. या अपघातामध्ये २५ मजूर जखमी झाले असून, हा अपघात रविवारी सकाळी ८:३० वाजण्याच्या सुमारास घडला. तर या अपघातस्थळी उभ्या असलेल्या दोन दुचाकीस्वारांना एका ट्रॅव्हलने उडवले. त्यात तीन जण जखमी झाले. युगल पाटील आमोदा, वासुदेव फेगडे बामणोद, ईश्वर बडगे सावदा अशी जखमींची नावे आहेत. त्यांची दुचाकी ट्रॅव्हलच्या खाली आल्याने त्याचे मोठे नुकसान झाले. या अपघातामुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा :
अमिताभ बच्चन यांनी विकले मुंबईतील प्रीमियम लोकेशनमधील 2 फ्लॅट्स
‘महिला विश्वचषक विजय हा 1983 सारखा नाही…
घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल हनी चिली पोटॅटो, कुरकुरीत बनवण्यासाठी काही खास टिप्स