मुंबई असो दिल्ली लोक कामानिमित्त तासंतास प्रवास करत असतात.(women) प्रत्येकाला पोट भरण्यासाठी, स्वप्न पूर्ण करण्यासाठी घराबाहेर पडावं लागतं. त्याच फक्त पुरुषच नाही तर महिलाही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असतात. यामुळे ट्रेनमध्ये किंवा मेट्रोमध्ये प्रचंड गर्दी असते.खूप धक्काबुक्की होते, कोनाचं सामान हरवतं, काणाला धक्का लागतो, कोणाला पाय लागतो आणि त्यावरुन होतात वाद. वाद झाले की, इतर प्रवासी त्यांच्या व्हिडीओ सोशल मीडियावर लगेचच अपलोड करुन जगाच्या काना कोपऱ्यात पोहोचवतात. पुढे दिल्ली मेट्रोमधला महिलांचा असा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

दिल्ली मेट्रोमध्ये प्रवाशांच्या गर्दीमुळे होणारे वाद काही नवीन नाहीत. (women) मात्र नुकताच घडलेला एक प्रकार सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आला आहे. दिल्ली मेट्रोच्या एका डब्यात बसण्याच्या जागेवरून दोन महिलांमध्ये जोरदार वाद झाला आणि हा वाद थेट हाणामारीपर्यंत पोहोचला. व्हायरल व्हिडीओमध्ये मेट्रोच्या डब्यात प्रवासी खूप गर्दीत उभे होते. याच दरम्यान बसण्याच्या जागेवरून दोन महिलांमध्ये वाद सुरू झाला.सुरुवातीला फक्त शब्दांत होणारा वाद काही क्षणांतच आक्रमक झाला. दोन्ही महिला एकमेकींवर ओरडायला लागल्या, मग एकमेकींचे केस ओढायला लागल्या. यामध्ये असे दिसले की, पुरुष प्रवासी महिलांना सोडवण्याचा प्रयत्न करत होते.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर होताच नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. (women) काहींनी गर्दी आणि तणावामुळे अशा घटना घडत असल्याचं सांगितलं आहे, तर काहींनी सार्वजनिक ठिकाणी संयम बाळगण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं आहे. दिल्ली मेट्रो ही शिस्त आणि सुरक्षिततेसाठी ओळखली जाते, मात्र अशा घटनांमुळे लोक मेट्रोने प्रवास करणं कमी करतील असं दिसत आहे.दिल्ली मेट्रो प्रशासनाकडून यापूर्वीही प्रवाशांना शिस्त पाळण्याचे आणि वाद टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गरज असल्यास सुरक्षारक्षक किंवा मेट्रो कर्मचाऱ्यांची मदत घेण्याचाही सल्ला दिला जातो. मात्र तरीही गर्दीच्या वेळेत अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा :

इचलकरंजीत संजय तेलनाडेंसह कुटुंबातील दोन सदस्यांचाही विजय; राहुल आवाडेंच्या कट्टर समर्थकाचा पराभव

कोल्हापूरच्या प्रभाग क्रमांक४ मध्ये दोन गटात तुफान हाणामरी

कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर