भारतीय क्रिकेटचा स्टार हार्दिक पंड्या सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आहे. नुकत्याच नताशा स्टॅनकोविकसोबतच्या घटस्फोटानंतर हार्दिक आता मॉडेल माहिका शर्मासोबत रिलेशनशिपमध्ये (romantic)असल्याचे स्पष्ट झाले आहे. काही दिवसांपूर्वी दोघे मालदीवमध्ये एकत्र स्पॉट झाले, जिथे हार्दिकने आपला वाढदिवस माहिकासोबत साजरा केला. या वाढदिवसाचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले गेले आहेत, जे लगेचच व्हायरल झाले.

व्हिडीओमध्ये दोघे एकत्र गाडी धुताना दिसत आहेत; हार्दिक साबण लावून कापडाने गाडी स्वच्छ करत आहे तर माहिका पाईपने पाणी घालत आहे. या दरम्यान माहिका हार्दिकच्या गालावर प्रेमाने(romantic) किस करताना दिसते, ज्यामुळे दोघांच्या नात्यातील घनिष्ठता प्रकट होते. काही फोटोमध्ये दोघे खूप जवळ असून त्यांच्या रोमँटिक पलोंची झलक मिळते.

त्याचबरोबर हार्दिकने आपल्या मुलगा अगस्त्यचेही फोटो शेअर केले आहेत, ज्यातून दिसते की माहिकसोबत असताना देखील हार्दिकला आपल्या मुलाची आठवण आहे. यंदा दिवाळी हार्दिकने आपल्या दोन प्रिय व्यक्तींवोबत – माहिका आणि अगस्त्य – साजरी केली. या चित्रांमधून चाहत्यांना हार्दिक पंड्याच्या कुटुंब आणि प्रेमाच्या आयुष्याची एकत्रित आणि आनंदी झलक पाहायला मिळते.

हेही वाचा :

‘शंकर महाराज’च्या नावे भोंदूगिरी, आयटी इंजिनिअरची भयंकर फसवणूक
लाडकी कोण? नावडती कोण? घराघरात भांडण… उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
ट्रेनमधून फुस्स करून फुत्कारला अजगर, पाहताच लोकांची हवा झाली टाईट; Video Viral