अभिनेत्री मलायका अरोरा नेहमी तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते.(diamond)आता पुन्हा एकदा ती सोशल मीडियावर प्रकाशझोतात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून मलायकाचं नाव एका नव्या तरुणाशी जोडलं जात आहे. मुंबईतील एका म्युझिक कॉन्सर्टनंतर आता या दोघांना एअरपोर्टवर एकत्र पाहिलं गेलं आहे.अभिनेता अर्जुन कपूरशी ब्रेकअप झाल्यानंतर मलायकाच्या आयुष्यात हर्ष मेहता नावाचा तरुण आला आहे. 29 ऑक्टोबर रोजी मुंबईतील एनरिक इग्लेसियासच्या कॉन्सर्टमध्ये या दोघांना पहिल्यांचा एकत्र पाहिलं गेलं होतं. हर्ष आणि मलायका यांच्या वयात तब्बल 17 वर्षांचं अंतर आहे.

33 वर्षांचा हर्ष हा हिरे व्यापारी असल्याचं कळतंय. (diamond)तर मलायका 50 वर्षांची आहे. बुधवारी 26 नोव्हेंबर रोजी या दोघांना मुंबई एअरपोर्टवर पाहिलं गेलं. हे दोघं एकाच टर्मिनलमधून बाहेर पडले, तेव्हा पापाराझींनी त्यांचे फोटो आणि व्हिडीओ क्लिक केले. यावेळी हर्षच्या चेहऱ्यावर मास्क होता.पापाराझींसमोर मलायका आणि हर्षने एकमेकांसोबत चालणं टाळलं होतं. त्यामुळे मलायका पुढे निघून आली आणि हर्ष तिच्या मागून चालत होता.

विशेष म्हणजे पार्किंगच्या ठिकामी पोहोचल्यानंतर आधी मलायका एका कारमध्ये बसली(diamond) आणि काही क्षणांनंतर हर्षसुद्धा त्याच कारमध्ये बसल्याचं पहायला मिळालं.मलायका किंवा हर्ष यांनी अद्याप त्यांच्या डेटिंगच्या चर्चांवर कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. मलायका 2018 मध्ये अभिनेता अर्जुन कपूरला डेट करू लागली होती. गेल्या वर्षीच या दोघांचा ब्रेकअप झाला. त्यापूर्वी तिने अभिनेता अरबाज खानशी लग्न केलं होतं. 2017 मध्ये मलायकाने घटस्फोट घेतला. अरबाज आणि मलायका यांना एक मुलगा आहे.

हेही वाचा :

हिवाळ्यात गुलाबाच्या रोपट्याला फुले येत नाहीत? या ट्रिक जाणून घ्या

‘या’ तारखेपासून राज्यातील ६०० शाळा बंद! फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

लग्नातच स्मृतीने पलाशला रंगेहाथ पकडलं? बॉलिवूड अभिनेत्याच्या नव्या दाव्याने खळबळ!