बिग बॉस मराठी 5 चा विजेता सूरज चव्हाण आता आपल्या आयुष्यातील(political) नव्या टप्प्याला सुरुवात करत आहे. सूरज चव्हाण लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. त्याच्या लग्नाच्या आधीच्या विधींना उत्साहात सुरुवात झाली आहे. या विधींचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. अशात त्याच्या लग्नपत्रिकेचा व्हिडीओदेखील चर्चेचा विषय ठरत आहे.व्हायरल पत्रिकेनुसार प्रमुख उपस्थिती म्हणून अजित पवार व त्यांच्या पत्नी सुनेत्रा अजित पवार यांच्यासह सुप्रिया सुळे, आमदार विजय बापू शिवतारे, संजय जगताप, अशोक टेकवडे आणि इतर बऱ्याच राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींची नावं आहेत. तर मनोरंजन विश्वामधून बिग बॉस होस्ट रितेश देशमुख, अक्षय कुमार, अशोक सराफ, पंढरीनाथ कांबळे, वर्षा उसगावकर हे मराठी आणि बॉलिवूड कलाकार असणार आहेत. अक्षय कुमारचे नाव यामध्ये लक्ष वेधून घेत आहे.

याशिवाय बिग बॉसमधली स्पर्धकांची टीम अभिजीत सावंत, केदार शिंदे, (political) अंकिता वालावलकर, आर्या जाधव, इरीना, अभिषेक करंगुटकर, अरबाज पटेल, निखिल दामले, वैभव चव्हाण, जान्हवी किल्लेकर, निक्की तांबोळी, धनंजय पोवार, संग्राम चौगुले, पुरुषोत्तम दादा पाटील, योगिता चव्हाण, घनश्याम दरडे, अंकिताचा नवरा कुणाल भगत, उत्कर्ष शिंदे यांसारख्या कलाकारांची नावे उपस्थितांमध्ये आहेत.

काही दिवसांपूर्वी सूरज आणि संजनाच्या प्री वेडिंग शुटचे व्हिडीओ व्हायरल झाले होते. (political) आता लग्नाची पत्रिकाही सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यानुसार, दोघांचा साखरपुडा समारंभ 29 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 12 वाजता, हळदी समारंभ 29 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 2 वाजता आणि लग्नसमारंभ त्याच दिवशी संध्याकाळी 6.11 वाजता या शुभ मुहूर्तावर होणार आहे. पुण्यातील माऊली गार्डन हॉल येथे संजना आणि सुरजचं लग्न थाटामाटात पार पडणार आहे. सुरजचे फॅन्स आता त्याचा विवाहसोहळा आणि त्याचा हटके लूक पाहण्यास उत्सुक आहेत.

हेही वाचा :

‘मी लग्न करायला तयार, पण फक्त मुलगी….’, युजवेंद्र चहल पुन्हा बोहल्यावर चढायला तयार

एका प्रेमीसाठी 5 मुलींमध्ये झाली हाणामारी! कपडे खेचले, झिंज्या उपटल्या अन्… Video Viral

हृदय हेलावणारी घटना, 20 चिमुकल्यांना अंगणवाडीत कोंडून ठेवलं; आक्रोश कॅमेऱ्यात कैद!