महाराष्ट्र आणि देशाचे नाव जगभरात उज्वल करणारे, महाराष्ट्र भूषण पुरस्कारप्राप्त(statue)ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांचे मंगळवारी 17 डिसेंबर मध्यरात्री निधन झाले. वयाच्या 100 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नुकताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांच्या निवासस्थानी जाऊन राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. अतुलनीय शिल्पकलेच्या माध्यमातून त्यांनी देशातील प्रत्येक राज्यात आपली छाप उमटवली. सरदार वल्लभभाई पटेल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह अनेक महान व्यक्तिमत्त्वांचे पुतळे हीच त्यांची जिवंत ओळख आहे.राम सुतार यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1925 रोजी महाराष्ट्रातील धुळ्यात झाला. धुळे जिल्ह्यातील गोंडूर गावात शिक्षणाची सोय उपलब्ध नसल्यामुळे त्यांनी मँट्रिकपर्यंत शिक्षण आपल्या नातेवाईकांकडे राहून पूर्ण केले. श्रीराम कृ.जोशींच्या मार्गदर्शनानुसार त्यांनी सर जे.जे.स्कूल ऑफ आर्ट मध्ये प्रवेश घेतला. सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातील सर्वात उंच पुतळा म्हणजेच गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिटीची संकल्पना राम सुतारांचीच आहे. हा 182 मीटरचा पुतळा राम सुतार यांच्याच संकल्पनेतून साकारण्यात आलाय.

संसदेबाहेर असलेला महात्मा गांधीचा ध्यानस्थ पुतळा (statue)असो किंवा लहान मुलांसोबत महात्मा गांधींची इतरही अनेक ठिकाणी साकारण्यात आलेली शिल्प असो, प्रत्येक शिल्पातून राम सुतार यांनी दगडात जिवंतपणा ओतला हेच खरं! नुकताच राजकोट येथे उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळाही राम सुतार यांनीच साकारला आहे. चंबल देवीचा 45 फुटांचा पुतळाही राम सुतारांनीच साकारलाय. त्यांनी बनवलेल्या 200 हून अधिक कलाकृती जगातल्या पाच खंडांमध्ये आहेत.राम सुतार यांचं शिक्षण मुंबईतील जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्स येथे झालं. 1952 मध्ये राम सुतार यांनी तत्कालीन बॉम्बे प्रांतातील सर जे. जे. आर्टस कॉलेजमध्ये शिल्पकलेची पदवी मिळवली. यावेळी त्यांना मानाचे मेयो सुवर्णपदक मिळाले. इ.स. 1954 मध्ये भारतीय पुरातत्त्व खात्यात नोकरीची सुरुवात केली.

सुरुवातीला त्यांनी पुरातत्व विभागात मॉडेलर म्हणून काम केलं. (statue)औरंगाबाद येथे कार्यरत होते. अजिंठा-वेरूळ लेण्यांमधील खराब झालेल्या शिल्पांची डागडुजी करण्याचे काम त्यांनी केले. इ.स.1958 मध्ये ते नोकरीनिमित्त दिल्लीला स्थलांतर केले. त्यांच्या शिल्पकार म्हणून कारकिर्दीला सन 1960 मध्ये चंबळ नदीच्या सीमेंट-कॉन्क्रीटच्या प्रतिकात्मक शिल्पाकृती ने झाली. हे शिल्प चंबळ नदीवरील गांधीसागर धरणाच्या ठिकाणी आहे.त्यांना केंद्र सरकारकडून पद्मश्री, पद्मभूषणसारख्या सर्वोच्च नागरी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. याच वर्षी त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करुन महाराष्ट्र सरकारनं गौरवलं होतं. त्यांना ‘शिल्पकलेचे भीष्माचार्य’ म्हटले जायचे. राम सुतार यांच्या निधनाने भारतीय कला विश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनानंतर एक मोठा गुणी कलाकार आपल्यातून निघून गेल्याची भावना व्यक्त होत आहे.

हेही वाचा :

केळीच्या पानावर का खावे? केळीच्या पानावर खाण्याचे फायदे काय? जाणून घ्या

महेंद्रसिंह धोनी IPL ला रामराम ठोकणार; ‘या’ दिग्गज खेळाडूचा खळबळजनक दावा

वेटिंग-RAC प्रवाशांना मोठा दिलासा, आता तिकीट स्टेटस 10 तास आधीच पाहता येणार