डिसेंबर 2025 हा केवळ वर्षाचा शेवटचा महिना नाही, तर अनेक महत्त्वाच्या (month)आर्थिक आणि करसंबंधित कामांची अंतिम मुदत असलेला निर्णायक काळ आहे. आज 17 डिसेंबर असल्याने नागरिकांकडे ही कामे पूर्ण करण्यासाठी केवळ 14 दिवसांचा कालावधी उरला आहे. वेळेत ही कामे पूर्ण न केल्यास दंड, व्याज, तसेच भविष्यातील आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे 31 डिसेंबरपूर्वी ही महत्त्वाची कामे पूर्ण करणे अत्यावश्यक ठरणार आहे.

करदाते आणि सामान्य नागरिकांसाठी हा कालावधी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. (month)आयकर विभागाकडून नियमांचे काटेकोर पालन केले जात असून, अंतिम मुदतीनंतर कोणतीही सवलत दिली जाणार नाही, असे स्पष्ट संकेत देण्यात आले आहेत. त्यामुळे “नंतर पाहू” ही भूमिका यावेळी महागात पडू शकते.जर तुम्ही आर्थिक वर्ष 2024-25 साठी अद्याप आयकर रिटर्न दाखल केलेला नसेल, तर 31 डिसेंबर 2025 ही अंतिम मुदत आहे. या तारखेपर्यंत विलंबित आयटीआर दाखल करता येणार आहे. मात्र, यासाठी दंड भरावा लागणार आहे. तुमचे वार्षिक उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा कमी असल्यास 1,000 रुपयांचा दंड, तर 5 लाख किंवा त्याहून अधिक उत्पन्न असल्यास 5,000 रुपयांचा दंड भरावा लागेल.
वेळेत आयटीआर न भरल्यास आयकर विभागाकडून नोटीस येण्याचा धोका वाढतो.(month)तसेच, तुमचा रिफंड अडकू शकतो किंवा काही प्रकरणांत तो पूर्णपणे गमावण्याचीही शक्यता असते. सातत्याने उशीर झाल्यास तुमचा कर रेकॉर्ड खराब होतो, ज्याचा परिणाम भविष्यात कर्ज, व्हिसा आणि आर्थिक नियोजनावर होऊ शकतो. डिसेंबरअखेरचे दुसरे अत्यंत महत्त्वाचे काम म्हणजे आधार आणि पॅन कार्ड लिंक करणे. जर तुम्ही 1 ऑक्टोबर 2024 रोजी किंवा त्याआधी आधार कार्ड घेतले असेल आणि अद्याप ते पॅनशी लिंक केले नसेल, तर 31 डिसेंबर 2025 पूर्वी हे काम पूर्ण करणे बंधनकारक आहे. अन्यथा तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय होऊ शकते.

पॅन निष्क्रिय झाल्यास बँकिंग व्यवहार, गुंतवणूक, म्युच्युअल फंड, (month) शेअर मार्केट तसेच पुढील वर्षी आयटीआर भरण्यात मोठ्या अडचणी येऊ शकतात. आधार–पॅन लिंक करण्यासाठी आयकर विभागाच्या ई-फायलिंग पोर्टलवर प्रक्रिया उपलब्ध असून, त्यासाठी ठराविक दंडही भरावा लागतो. त्यामुळे शेवटच्या क्षणाची घाई टाळून हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा सल्ला तज्ज्ञ देत आहेत.डिसेंबर 2025 हा महिना करदात्यांसाठी निर्णायक ठरणार असून, 31 डिसेंबरनंतर कोणतीही मुदतवाढ मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे दंड, नोटीस आणि भविष्यातील आर्थिक त्रास टाळण्यासाठी ही दोन्ही महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण करा, असे आवाहन करण्यात येत आहे.
हेही वाचा :
दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! ‘हे’ आयडी कार्ड असणं बंधनकारक
ठाकरे गटाला मोठा धक्का; माजी आमदार भाजपच्या वाटेवर
JIOने दिली खुशखबर! 2026 मध्ये रिचार्ज होणार स्वस्त, फक्त १०३ रुपयांपासून सुरुवात