डायबेटीसच्या रुग्णांना नेहमीच खाण्यापिण्याचं पत्थ पाळावं लागतं.(diabetic) त्यामध्ये बरेच पदार्थ टाळण्याचा डॉक्टर त्यांना सल्ला देतात. या रुग्णांचा दिवसाच्या सुरुवातीचा नाश्ता महत्वाचा आहार मानला जातो. त्याने शरीराला आवश्यक असणारे फायबर आणि प्रोटीन मिळतं आणि दिवसभर ऊर्जा टिकते. त्यात एक पदार्थ म्हणजे इडली आणि डोसा. हे पारंपरिक पदार्थ देशभरात नाश्त्यासाठी आवडीने खाल्ले जातात. मात्र डायबेटीज असलेल्या रुग्णांच्या मनात नेहमीच प्रश्न असतो की, इडली-डोसा खाणं सुरक्षित आहे का?तज्ज्ञांच्या मते, योग्य पद्धतीने आणि योग्य प्रमाणात खाल्ल्यास डायबेटिस असलेले रुग्णही इडली आणि डोसा खाऊ शकतात. हे दोन्ही पदार्थ तांदूळ आणि उडदाच्या डाळीपासून तयार केले जातात. त्यामध्ये फॅटचे प्रमाण कमी असतं. सांबारमध्ये प्रोटीन आणि भाज्यांमधून मिळणारं फायबर भरपूर असतं, तर नारळ आणि टोमॅटो चटणीमुळे आवश्यक पोषक घटक मिळतात.

इडलीचा ग्लायसेमिक इंडेक्स साधारणतः कमी ते मध्यम असतो.(diabetic) इडलीचे पीठ आंबवलेलं असतं. त्याने शरीरातलं फायबरचं प्रमाण वाढतं आणि कार्बोहायड्रेट्स हळूहळू रक्तात शोषले जातात. डोशाचा ग्लायसेमिक इंडेक्स मध्यम असतो, मात्र त्यामध्ये भाज्या, डाळी किंवा मल्टिग्रेन घटक वापरल्याने रक्तातील साखरेवर होणारा परिणाम कमी करता येतो.डॉक्टर सांगतात की, डायबेटिस असलेल्या व्यक्तींनी इडली-डोसा खाताना प्रमाणावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. पांढऱ्या तांदळाऐवजी ब्राउन राईस, ज्वारी, बाजरी, ओट्स किंवा नाचणी यांसारख्या धान्यांचा वापर केल्यास फायबरचे प्रमाण वाढतं. तर डोसा बनवताना तेल कमी वापरणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. नाश्त्यासोबत दही, डाळी किंवा भाज्यांचा समावेश केल्यास कार्बोहायड्रेट्सचे शोषण नॉर्मल पद्धतीने होते.

योग्य साहित्य वापरून तयार केलेल्या इडली आणि डोशामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.(diabetic) जे मधुमेह नियंत्रणासाठी खूप महत्त्वाचं आहे. मर्यादित प्रमाणात कार्बोहायड्रेट्स शरीराला आवश्यक ऊर्जा देतात. याशिवाय भाज्यांमधून मिळणारे जीवनसत्त्वं आणि खनिजे एकूण आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. इडली आणि डोसा पचायला हलका असल्यामुळे पचनाच्या तक्रारी असलेल्या डायबेटिस रुग्णांसाठीही हे पदार्थ योग्य मानले जातात. आंबवण्याची प्रक्रिया केल्यामुळे आतड्यांचे आरोग्य सुधारतं आणि पोषक घटकांचे शोषण जास्त चांगल्या प्रकारे होते.

हेही वाचा :

इचलकरंजीतील एका खाजगी शाळेत तिसरीत शिकणाऱ्या मुलीला महिला शिक्षिकेने किरकोळ कारणावरून केली बेदम मारहाण

राजकीय भूकंप! माणिकराव कोकाटेंना रुग्णालयातूनच बेड्या ठोकणार?

४ कोर्टाला बॉम्बने उडवण्याची धमकी, राज्यात खळबळEdit