फास्ट फूड म्हटलं की लहान मुलांपासून ते तरूणांपर्यंत जवळपास प्रत्येकाला हे फार आवडतं.(cancer) लहान मुलं आणि तरूण मंडळी यांच्यात फास्ट फूडची आवड वाढलीये. इतकचं नाही तर आता एक क्लिकवर तुम्हाला घरपोच फास्ट फूडची डिलीव्हरी मिळते. मात्र ही आवड आणि ऑलनाईन ऑर्डरिंगची वाढती सवय भविष्यात कॅन्सर सारख्या गंभीर आजारांना आमंत्रण देत असल्याचा इशारा आरोग्यतज्ज्ञांनी दिला आहे.आधुनिक जीवनशैली, व्यस्त दिनक्रम आणि एका क्लिकवर घरबसल्या हवा तो पदार्थ मिळण्याची सोय यामुळे लोक जंक फूडकडे अधिक आकर्षित होतायत. मात्र हे आरोग्यासाठी घातक असून यामुळे कॅन्सर होत असल्याचं समोर आलं आहे.

तज्ज्ञांच्या मतानुसार, फास्ट फूडमध्ये असलेलं मीठाचं अधिक प्रमाण, (cancer) साखरेचं जास्त प्रमाण, ट्रान्स-फॅट आणि प्रोसेस्ड घटक inflammation निर्माण करतात आणि पेशींमध्ये बदल घडवून कॅन्सरचा धोका वाढवू शकतात. विशेषतः बर्गर, पिझ्झा, फ्राईड आयटम्स, सॉफ्ट ड्रिंक्स आणि प्रोसेस्ड मीटचा वारंवार वापर अधिक धोकादायक मानला जातो.ऑनलाइन फूड ऑर्डरिंगमुळे लोक वारंवार, मोठ्या प्रमाणात आणि अनेकदा रात्री उशिरा जंक फूडचं सेवन करत असल्याचं दिसून आलंय. परिणामी यामुळे लठ्ठपणा, हार्मोनल असंतुलन आणि मेटाबॉलिक सिंड्रोम वाढतो. या घटकांचा आणि स्तनाचा, कोलनचा आणि यकृताच्या कॅन्सरशी संबंधित असल्याचं अनेक अभ्यासामधून समोर आलं आहे.

तज्ज्ञांनी फूड डिलिव्हरीमध्ये वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक(cancer) आणि कोटेड पॅकेजिंगमध्ये असलेले PFAS, बीपीए-BPA आणि माइक्रोप्लास्टिक्स ही रसायनंही धोकादायक असल्याचे सांगितले. गरम अन्नाशी याचा संपर्क आल्यावर ही रसायनं अन्नात मिसळू शकतात आणि याचमुळे कॅन्सर वाढण्याचा धोका निर्माण होतो.तळेगावातील टीजीएच ऑन्कोलाइफ कॅन्सर सेंटरचे रेडिएशन ऑन्कोलॉजी डॉ. गौरव जसवाल यांनी सांगितलं की, फास्ट फूड आणि ऑनलाइन ऑर्डरिंग हा एक सोपा मार्ग वाटत असला आणि लोकांना वाटतं की अधूनमधून फास्ट फूड खाल्ल्याने काही फरक पडत नाही.

पण ही सततची सवय शरीरात विषारी रसायनांची पातळी वाढवते (cancer) आणि शरीरात इन्फ्लामेशन निर्माण करुन आणि हार्मोनल बदलांमुळे कॅन्सरची सुरुवात करण्यास कारणीभूत ठरते.डॉ. जसवाल पुढे सांगतात की, फास्ट फूड आणि ऑनलाइन ऑर्डरिंगमुळे कॅन्सरचा धोका टाळण्यासाठी काही सोप्या सवयींचे पालन करा. शक्यतो घरचं ताजं अन्न खाल्लं पाहिजे. फळे, भाज्या, संपूर्ण धान्य यांचा आहारात समावेश करा. बर्गर, पिझ्झा, फ्रेंच फाईज आणि रेडी-टू-ईट पदार्थांपासून लांब रहा. तसंच, वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करा आणि साखर, मीठ व तेलाचे प्रमाण मर्यादित ठेवा.

हेही वाचा :

केळीच्या पानावर का खावे? केळीच्या पानावर खाण्याचे फायदे काय? जाणून घ्या

महेंद्रसिंह धोनी IPL ला रामराम ठोकणार; ‘या’ दिग्गज खेळाडूचा खळबळजनक दावा

वेटिंग-RAC प्रवाशांना मोठा दिलासा, आता तिकीट स्टेटस 10 तास आधीच पाहता येणार