भारताचे माजी कर्णधार (captain)आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा नायक रोहित शर्मा सध्या कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवत असल्याचे दिसत आहे. पहिल्या सामन्यात अपयशानंतर दुसऱ्या सामन्यात 73 धावा आणि तिसऱ्या सामन्यात शतकी खेळी करत रोहितने आपल्या फॉर्मचा जोर दाखवला. पुढील सामना 30 नोव्हेंबर 2025 रोजी असून चाहते त्याच्या मैदानावरील कामगिरीसाठी उत्सुक आहेत.ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून परतल्यानंतर, रोहितने सोशल मीडियावर आपले मित्रमंडळी आणि कुटुंबासोबतचे क्षण शेअर करणे सुरू केले आहे. 6 नोव्हेंबर 2025 रोजी इंस्टाग्रामवर शेअर केलेला रोहितचा नवीन व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

व्हिडिओमध्ये रोहितने आपल्या मित्रांसोबत पेन प्रँक केले. सुरुवातीला, त्याचा मित्र त्याला पेन देतो आणि ऑटोग्राफ विचारतो. रोहित पेन तपासल्यानंतर म्हणतो, “हा पेन नाही, यात काय आहे ते मला माहित आहे? थांब मी तुला दाखवतो.” त्यानंतर रोहित त्याचा पेन एका मित्राला देतो आणि ऑटोग्राफ करण्यास सांगतो.जसजसा मित्र पेन उघडण्याचा प्रयत्न करतो, त्याला धक्का बसतो.
हा क्षण पाहून रोहित जोरात हसतो आणि विचारतो, “काय झाले?” नंतर रोहित मुंबई रणजी संघाच्या जिममध्ये पोहोचतो, जिथे धवल कुलकर्णी आणि शार्दुल ठाकुर कसरत(captain) करत होते. रोहित धवलला पेन देतो आणि ऑटोग्राफसाठी सांगतो, मात्र धवलला सुद्धा वायब्रेशनचा धक्का बसतो आणि पेन खाली पडतो. हा दृश्य पाहून रोहित हसून पोट धरतो.

हेही वाचा :
ओव्याचे की जिऱ्याचे पाणी…वजन झपाट्याने कमी करण्यासाठी दोघांपैकी कोणते ठरेल फायदेशीर
वजन वाढतंय म्हणून भात खाणे बंद केले? थांबा.. वाचा ही फायद्याची माहिती
पार्थ पवारांच्या कंपनीकडून केला जमीन घोटाळा? देवेंद्र फडणवीसांनी उगारला कारवाईचा बडगा