आजकाल सोशल मीडियावर आरोग्य सुधारण्यासाठी शेकडो उपाय उपलब्ध आहेत. यामध्ये जिरे आणि ओव्याचे पाणी(water) सर्वाधिक चर्चेत आहे. भारतीय स्वयंपाकघरात या दोन्ही मसाल्यांचा प्राचीन काळापासून उपयोग आरोग्य आणि पोषणासाठी केला जातो. दोन्हीमध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असल्यामुळे आयुर्वेदात त्यांचे महत्त्व सांगितले जाते.

जिरे:

प्रथिने, हेल्दी फॅट, कार्बोहायड्रेट्स, फायबर, कॅल्शियम, लोह, पोटॅशियम, जीवनसत्त्वे A, K, E.

पोटाची समस्या दूर करण्यास उपयुक्त, रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.

ओवा:

प्रथिने, फायबर, हेल्दी फॅट, कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, जस्त, पोटॅशियम, व्हिटॅमिन B कॉम्प्लेक्स.

पचनक्रिया सुधारते, भूक आणि क्रेविंग्स नियंत्रित करते, ग्लुकोजची वाढ थांबवते.

तज्ज्ञांच्या मते, वजन कमी करण्यासाठी ओव्याचे पाणी(water) अधिक प्रभावी आहे. ओव्यामध्ये असलेले थायमॉल पचनक्रिया गतीशील करते आणि शरीरातील गोड खाण्याची इच्छा कमी करते. तर जिरे पोटातील आम्लता नियंत्रित करते, फुगणे, गॅस आणि आम्लपित्त कमी करते.

ओव्याचे पाणी तयार करण्यासाठी:

रात्री पाण्यात एक चमचा ओवा भिजवून ठेवा.

सकाळी थोडे गरम करून प्या.

नियमित सेवन केल्यास वजन कमी होण्यास मदत होते, त्वचा तजेलदार राहते आणि शरीराला फायबर मिळतो.

तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, वजन कमी करण्याच्या दैनंदिन आहारात ओव्याचे पाणी नियमितपणे समाविष्ट करणे सर्वोत्तम ठरते.

हेही वाचा :

वजन वाढतंय म्हणून भात खाणे बंद केले? थांबा.. वाचा ही फायद्याची माहिती
पार्थ पवारांच्या कंपनीकडून केला जमीन घोटाळा? देवेंद्र फडणवीसांनी उगारला कारवाईचा बडगा
KGF मधील या अभिनेत्याच निधन….