भारतीय स्वयंपाकघरातील सर्वाधिक सुगंधी मसाल्यांपैकी एक असलेली हिरवी वेलची(cardamoms) ही केवळ अन्नाची चव आणि सुगंध वाढवण्यासाठीच नव्हे, तर आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर असल्याचे आरोग्यतज्ञ सांगतात. प्रसिद्ध योगगुरू आणि लेखिका हंसा योगेंद्र यांनी आपल्या यूट्यूब चॅनेलवर शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये सांगितले की, जर आपण दररोज १५ दिवस दोन वेलची चावून खाल्ल्या, तर शरीरात अनेक सकारात्मक बदल जाणवतात. वेलचीच्या नैसर्गिक तेलात असलेले अँटीबॅक्टेरियल गुणधर्म तोंडातील जीवाणूंना नष्ट करून श्वास ताजेतवाने ठेवतात आणि दुर्गंधीपासून मुक्तता देतात. प्राचीन काळी राजे-महाराजेदेखील जेवणानंतर वेलची खाण्याची सवय ठेवत असत. सध्या सर्दी, खोकला आणि श्वसनाच्या समस्यांनी त्रस्त असलेल्या लोकांसाठीही वेलची उपयोगी ठरते, कारण ती उष्ण असून श्लेष्मा कमी करण्यास मदत करते.

हंसा योगेंद्र यांच्या मते, वेलची (cardamoms)पचनसंस्थेसाठी अमृतासमान आहे. ती पाचक एन्झाइम्स सक्रिय करते, ज्यामुळे अन्न पटकन पचते आणि जडपणा, गॅस, सूज यांसारख्या त्रासात आराम मिळतो. याशिवाय वेलचीतील अँटीऑक्सिडंट्स शरीरातील जादा मीठ आणि पाणी बाहेर काढतात, ज्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो आणि हृदयावरील ताण कमी होतो. सौम्य उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांसाठी वेलचीचे नियमित सेवन फायदेशीर असल्याचे संशोधनात दिसून आले आहे.वेलचीचा वापर अनेक प्रकारे करता येतो — दररोज दोन वेलची चावून खाणे, वेलची पावडरमध्ये मध, लिंबू आणि काळी मिरी मिसळून तयार केलेला सिरप घेणे, किंवा वेलची, दालचिनी आणि काळी मिरी घालून बनवलेली हर्बल टी पिणे हे विशेषतः खोकल्यावर परिणामकारक ठरते.

आरोग्यतज्ज्ञांच्या मते, वेलचीतील नैसर्गिक घटक शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकतात, आम्लपित्त आणि पोटातील जळजळ कमी करतात, तसेच मन शांत ठेवतात आणि मानसिक ताण कमी करतात. तिचा सुगंध मेंदूला ताजेतवाने करून एकाग्रता वाढवतो. शिवाय वेलची रोगप्रतिकारशक्ती वाढवते, सर्दी-खोकल्यापासून संरक्षण देते आणि दात-हिरड्यांचे आरोग्य सुधारते. रात्री झोपण्यापूर्वी दुधात वेलची घालून घेणे ही एक जुनी पण प्रभावी आयुर्वेदिक पद्धत असून ती झोप चांगली लागण्यासाठी उपयुक्त आहे. एकूणच, वेलची हा केवळ सुगंधी मसाला नसून, शरीर, मन आणि पचनासाठी एक नैसर्गिक औषध आहे. मात्र, तिचे सेवन नेहमी प्रमाणातच करणे आरोग्यासाठी योग्य ठरते.

हेही वाचा :

लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाची बातमी! 
पाणी मुरलंय “जमिनी”त! अजित पवार अडचणीत!
विकी कौशल झाला बाबा; कॅटरीनाने दिला गोंडस मुलाला जन्म