राज्यासह देशभरात अमली(Drug) पदार्थांच्या विरोधात पोलिसांनी कठोर धोरण अवलंबलेलं आहे. असे असले तरी अनेक छुप्या माध्यमातून या अमली पदार्थांची तस्करी होत असते. परिणामी तरुण या अशा ड्रग्स आणि शरीराला घातक असेलेल्या नशेच्या आहारी जाऊन आयुष्य बरबाद करण्याच्या मार्गावर ओढवले जातात. अशाच एका रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश करत मोठी कारवाई केली आहे.

यात सांगलीच्या मिरज शहरात नशेच्या गोळ्यांची विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात महात्मा गांधी चौक पोलिसांना यश आले. या कारवाईत पोलिसांनी एका अल्पवयीन संशयीतासह चौघांना अटक केली. शिवाय त्यांच्याकडून एक लाख 73 हजार रुपये किमतीचे 928 नशेच्या गोळ्या(Drug) जप्त करण्यात आल्या.
पुढे आलेल्या माहितीनुसार, अरबाज उर्फ इब्राहिम रेठरेकर , अब्दुलरझाक अब्दुलरहीमान शेख, उमरफराज राजू शेख आणि एक अल्पवयीन अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
मिरज शहरातील महात्मा गांधी चौक ते कुपवाड रस्त्यावर एका हॉटेल जवळ दोघेजण नशेच्या गोळ्यांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती महात्मा गांधी चौक पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी एक पथक तयार केले. या पथकाने महात्मा गांधी चौक येथे सापळा लावला असता त्यांना दोघे संशयित चालत येताना दिसले. त्यांच्या पाठोपाठ दोघेजण दुचाकीवरून येऊन त्यांच्याकडे नशेच्या गोळ्या(Drug) सुपूर्त केल्या.
चौघांवर पथकाने छापा टाकून त्यांना अटक केली. त्यांच्याकडून 1 लाख 73 हजार रुपये किमतीच्या नशेच्या गोळ्या आणि गांजा जप्त करण्यात आला. याबाबत महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आलाय. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून यातील बडे मासे नेमके कोण? याचा देखील तपास करत आहे. मात्र या घटनेने जिल्ह्यात एकाच खळबळ उडाली आहे.

धुळे जिल्ह्यातील आरोग्य विभागात कंत्राटी नोकरी लावून देण्याचा आमिष दाखवून नाशिकसह धुळ्यातील 90 जणांची सुमारे दीड कोटी रुपयांची फसवणूक करून पसारा झालेल्या संशयित वैभव पोळ याला कोकणातील श्रीवर्धनमधून गुंडा विरोधी पथकाने ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी मागील महिन्यात सरकार वाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गेल्या एक महिन्यापासून नाशिक पोलिसांकडून वैभव पोळ याचा शोध सुरू होता श्रीवर्धनच्या समुद्रकिनाऱ्यालगतच्या रिसॉर्टवर शोध सुरू असताना त्याला काल पहाटे एका रिसॉर्ट मधून गुंडा विरोधी पथकाने ताब्यात घेतली आहे.
हेही वाचा :
“मराठी”च्या मोर्चाला प्रतिबंध पोलीस प्रशासनाचा दुजाभाव
कोण आहे टीम इंडियातील सासू? पंत आणि गंभीरने कपिलच्या शोवर केला खुलासा, Video Viral
रिलसाठी पालकांनीच चिमुकलीचा जीव घातला धोक्यात; धरणाच्या रेलिंगवर बसवले अन्…, Video Viral