हिवाळ्याच्या थंडीत शरीरात थकवा, चेहऱ्यावरील फिकटपणा, केस गळणे किंवा जास्त झोप येणे यासारखी समस्या निर्माण होणे सामान्य आहे, मात्र हे फक्त हवामानामुळे नसून शरीरातील रक्ताभाव याचं लक्षणही असू शकतं. या समस्येवर उपाय म्हणून औषधे किंवा गोळ्यांवर अवलंबून राहण्याऐवजी, नैसर्गिक भाज्या(vegetables) आहारात समाविष्ट केल्यास शरीरातील लोहाची कमतरता भरून निघू शकते आणि ऊर्जा टिकवता येते.

सिमला मिरची ही व्हिटॅमिन सीने समृद्ध असून, शरीरात लोह शोषण्याची क्षमता वाढवते. सलाड, सूप किंवा भाजीत समाविष्ट केल्यास थकवा कमी होतो, रक्त शुद्ध राहते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते. पालक हा नैसर्गिक रक्तवर्धक असून, लोह, फोलेट, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात देते. पालक भाजी, सूप किंवा वाफवून सेवन केल्यास लाल रक्तपेशींचं उत्पादन वाढतं आणि अॅनिमिया नियंत्रणात राहतो.

मेथीची भाजी(vegetables) ही थकवा दूर करते, रक्ताची गुणवत्ता सुधारते आणि त्वचेला नैसर्गिक तेज देते. सकाळच्या पराठ्यात किंवा रात्रीच्या जेवणात मेथीचा समावेश केल्यास शरीरात उष्णता टिकून राहते. ब्रोकोली ही लोह, व्हिटॅमिन सी आणि फायबरने समृद्ध असून, शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढते, रक्त स्वच्छ ठेवते आणि हिमोग्लोबिन पातळी वाढवते. हलक्या वाफेवर शिजवून सेवन केल्यास तिचे पोषक गुण अबाधित राहतात.

शेवटी, बिट हे नैसर्गिक रक्तवर्धक टॉनिक आहे, ज्यात लोह, फोलेट आणि व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते. सूप, रस किंवा सलाड स्वरूपात बिट घेतल्यास ऊर्जा मिळते आणि रक्ताभावामुळे होणारी अशक्तता दूर होते. या पाच हिवाळी भाज्या — सिमला मिरची, पालक, मेथी, ब्रोकोली आणि बिट — नियमित आहारात समाविष्ट केल्यास शरीर सशक्त राहते आणि थंडीचा परिणाम कमी जाणवतो.

हेही वाचा :

इचलकरंजी महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ आरक्षण सोडत कार्यक्रम मंगळवार दि. ११ नोव्हेंबर रोजी होणार
‘रामायण’मधील शूर्पणखा: 38 वर्षांनी तिचा बदल पाहून थक्क व्हाल!
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅट हवे; काँग्रेसची उच्च न्यायालयात धाव