इचलकरंजी महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ करीता राज्य निवडणूक(Election) आयोगांने आरक्षण सोडतीचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर केला आहे. यानुसार दिनांक मंगळवार ११/११/२०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता इचलकरंजी महानगरपालिकेचे श्रीमंत नारायणराव बाबासाहेब घोरपडे नाट्यगृहात आरक्षण सोडतीचा कार्यक्रम ठेवणेत आला असून अनुसूचित जाती महिला, नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला व सर्वसाधारण महिला तसेच सर्वसाधारण जागा निश्चिती होणार आहे.

आरक्षण सोडती नंतर त्याची प्रारूप प्रसि‌द्धी सोमवार दिनांक १७/११/२०२५ रोजी करणेत येणार असून हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी सोमवार दिनांक १७/११/२०२५ ते सोमवार दिनांक २४/११/२०२५ (दुपारी ३.०० वाजेपर्यंत) या कालावधीत हरकती व सूचना महापालिकेचे मुख्य कार्यालयातील निवडणूक(Election) विभागात सादर करता येतील. यानंतर आरक्षणाची अंतिम अधिसूचना महापलिके कडून प्रसिद्ध करणेत येणार असले बाबत आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांनी प्रसिद्धी पत्रका‌द्वारे माहिती दिली आहे.

हेही वाचा :

‘रामायण’मधील शूर्पणखा: 38 वर्षांनी तिचा बदल पाहून थक्क व्हाल!
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅट हवे; काँग्रेसची उच्च न्यायालयात धाव
Google Maps मध्ये 10 नव्या फीचर्सचा समावेश, Gemini AI सह आणखी काय आहे खास