लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी राज्य सरकारकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत महिलांना ई-केवायसी(eKYC) पूर्ण करण्याची अंतिम तारीख १८ नोव्हेंबर निश्चित करण्यात आली आहे. केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच महिलांना पुढील हप्त्याचा लाभ मिळणार असल्याने लाभार्थ्यांमध्ये मोठी हालचाल दिसून येत आहे.दरम्यान, अधिकृत आकडेवारीनुसार आतापर्यंत सुमारे ८० लाख महिलांनीच केवायसी पूर्ण केली आहे, तर लाखो लाभार्थ्यांची प्रक्रिया अद्याप बाकी आहे. त्यामुळे केवायसीसाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी अनेक महिलांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

आदिती तटकरे म्हणाल्या,

“आतापर्यंत ८० लाख महिलांचे ई-केवायसी पूर्ण झाले आहे. उर्वरित लाभार्थ्यांचे केवायसी १८ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. तथापि, जर सर्व महिलांचे केवायसी(eKYC)वेळेत पूर्ण झाले नाही, तर परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल.”दरम्यान, सरकारने https://ladakibahin.maharashtra.gov.in/ या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन केवायसी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मात्र, या प्रक्रियेत अनेकांना तांत्रिक अडचणी येत आहेत — काही वेळा वेबसाइट लोड होत नाही तर काही वेळा ओटीपी येत नाही. त्यामुळे सरकारने ही प्रणाली अधिक सोपी आणि सुलभ करण्यासाठी सुधारणा केल्या असून, दिवसाला १० लाख महिलांना केवायसीची परवानगी देण्यात आली आहे. यापूर्वी ही मर्यादा फक्त ५ लाख होती.

दरम्यान, लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी जमा होणार, याबाबत महिलांमध्ये उत्सुकता आहे. ऑक्टोबरचा हप्ता उशिरा जमा झाला होता, त्यामुळे नोव्हेंबरचा हप्ता देखील विलंबाने येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.सरकारकडून याबाबत लवकरच अधिकृत घोषणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा :

‘या’ ४ जिल्ह्यांमधून जाणार नवा हायवे, असा असणार रूट
सावधान! लाखो Android युजर्सना सरकारचा तातडीचा इशारा…
आज सिंह गवत चरत होता” म्हणत सूर्यकुमारने ‘या’ अव्वल खेळाडूची उडवली खिल्ली Video व्हायरल